Philippians 4:8 in Marathi 8 बंधूंनो,शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुध्द आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांवर विचार करा.
Other Translations King James Version (KJV) Finally, brethren, whatsoever things are true, whatsoever things are honest, whatsoever things are just, whatsoever things are pure, whatsoever things are lovely, whatsoever things are of good report; if there be any virtue, and if there be any praise, think on these things.
American Standard Version (ASV) Finally, brethren, whatsoever things are true, whatsoever things are honorable, whatsoever things are just, whatsoever things are pure, whatsoever things are lovely, whatsoever things are of good report; if there be any virtue, and if there be any praise, think on these things.
Bible in Basic English (BBE) For the rest, my brothers, whatever things are true, whatever things have honour, whatever things are upright, whatever things are holy, whatever things are beautiful, whatever things are of value, if there is any virtue and if there is any praise, give thought to these things.
Darby English Bible (DBY) For the rest, brethren, whatsoever things [are] true, whatsoever things [are] noble, whatsoever things [are] just, whatsoever things [are] pure, whatsoever things [are] amiable, whatsoever things [are] of good report; if [there be] any virtue and if any praise, think on these things.
World English Bible (WEB) Finally, brothers, whatever things are true, whatever things are honorable, whatever things are just, whatever things are pure, whatever things are lovely, whatever things are of good report; if there is any virtue, and if there is any praise, think about these things.
Young's Literal Translation (YLT) As to the rest, brethren, as many things as are true, as many as `are' grave, as many as `are' righteous, as many as `are' pure, as many as `are' lovely, as many as `are' of good report, if any worthiness, and if any praise, these things think upon;
Cross Reference Matthew 22:16 in Marathi 16 परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हाला माहीत आहे की आपण खरे आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही.आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही.
Acts 10:22 in Marathi 22 ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हाला आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल्य हा शताधिपती आहे. तो चांगला धर्मशील मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हाला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.”
Acts 22:12 in Marathi 12 मग हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता, आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
Romans 2:29 in Marathi 29 कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय; आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय. आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
Romans 12:9 in Marathi 9 प्रीती निष्कपट असावी. वाइटापासून दूर रहा; चांगल्याला बिलगून रहा.
Romans 13:3 in Marathi 3 कारण चांगल्या कामात अधिकार्यांची भीती नाही, पण वाईट कामात असते; मग, तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर, आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल.
Romans 13:13 in Marathi 13 दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.
1 Corinthians 4:5 in Marathi 5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
1 Corinthians 13:1 in Marathi 1 मी मनुष्यांच्या आणि व देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
2 Corinthians 6:8 in Marathi 8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या, आणि तरी खरे आहोत,
2 Corinthians 8:18 in Marathi 18 आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्याला पाठवत आहोत.
2 Corinthians 8:21 in Marathi 21 अाम्ही 'प्रभूच्या दृष्टीने जे मान्य', इतकेच नव्हे तर 'मनुष्यांच्याही' दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.
2 Corinthians 13:7 in Marathi 7 आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नाही, पण आम्ही पसंतीस न उतरलेले असलो तरी तुम्ही चांगले ते करावे.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Ephesians 5:9 in Marathi 9 कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्व, आणि सत्यात दिसून येतात.
Ephesians 6:14 in Marathi 14 तर मग ! सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा.
Philippians 3:1 in Marathi 1 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्यें आनंद करा. तुम्हाला पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षीतपणाचें आहे.
Colossians 4:5 in Marathi 5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
1 Thessalonians 4:12 in Marathi 12 बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे, आणि तुम्हास कशाचीहि गरज पडू नये म्हणून,
1 Thessalonians 5:21 in Marathi 21 सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते बळकट धरा.
1 Timothy 2:2 in Marathi 2 आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्यां सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
1 Timothy 3:4 in Marathi 4 आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा.
1 Timothy 3:7 in Marathi 7 त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये
1 Timothy 3:11 in Marathi 11 त्याचप्रमाणे, स्रियांनीही प्रतिष्ठित असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
1 Timothy 4:12 in Marathi 12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .
1 Timothy 5:10 in Marathi 10 जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.
Titus 1:8 in Marathi 8 तर अतिथिप्रिय, चांंगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,
Titus 2:2 in Marathi 2 त्या अशा की, वृध्द पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे, आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.
Titus 2:7 in Marathi 7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Titus 3:14 in Marathi 14 आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी ; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.
Hebrews 13:18 in Marathi 18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेकबुद्धी शुध्द आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत राहावे अशी आमची इच्छा आहे.
James 1:27 in Marathi 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुध्द व निर्दोष ठरते.
James 3:17 in Marathi 17 पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुध्द, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
1 Peter 2:12 in Marathi 12 आणि, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
1 Peter 4:8 in Marathi 8 आणि सर्वांत महत्वाची गोष्ट ही की, आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकते.
2 Peter 1:3 in Marathi 3 ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या आेळखीच्या द्वारे, त्याच्या आपल्याला, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
1 John 3:3 in Marathi 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुध्द आहे, तसा तो आपणाला शुध्द करतो
1 John 3:18 in Marathi 18 प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.