Luke 24:44 in Marathi 44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
Other Translations King James Version (KJV) And he said unto them, These are the words which I spake unto you, while I was yet with you, that all things must be fulfilled, which were written in the law of Moses, and in the prophets, and in the psalms, concerning me.
American Standard Version (ASV) And he said unto them, These are my words which I spake unto you, while I was yet with you, that all things must needs be fulfilled, which are written in the law of Moses, and the prophets, and the psalms, concerning me.
Bible in Basic English (BBE) And he said to them, These are the words which I said to you when I was still with you, how it was necessary for all the things which are in the writings of Moses and the prophets and in the Psalms about me, to be put into effect.
Darby English Bible (DBY) And he said to them, These [are] the words which I spoke to you while I was yet with you, that all that is written concerning me in the law of Moses and prophets and psalms must be fulfilled.
World English Bible (WEB) He said to them, "This is what I told you, while I was still with you, that all things which are written in the law of Moses, the prophets, and the psalms, concerning me must be fulfilled."
Young's Literal Translation (YLT) and he said to them, `These `are' the words that I spake unto you, being yet with you, that it behoveth to be fulfilled all the things that are written in the Law of Moses, and the Prophets, and the Psalms, about me.'
Cross Reference Matthew 16:21 in Marathi 21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरुशलेमेला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.
Matthew 17:22 in Marathi 22 जेव्हा ते एकत्र गालीलात आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती धरून दिला जाणार आहे.
Matthew 20:18 in Marathi 18 “पाहा, आपण यरुशलेमेकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरतील.
Matthew 26:54 in Marathi 54 परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?
Matthew 26:56 in Marathi 56 परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
Mark 8:31 in Marathi 31 तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
Mark 9:31 in Marathi 31 कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
Mark 10:33 in Marathi 33 “पाहा! आपण वर यरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला परराष्ट्रीय लोकांच्या हाती देतील.
Luke 9:22 in Marathi 22 आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे सोसावी, आणि वडील व मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, व जीवे मारले जावे, व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.
Luke 9:44 in Marathi 44 या गोष्टी तुम्ही लक्षांत ठेवा कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे.
Luke 18:31 in Marathi 31 येशूने निवडलेल्या बाराजणांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, 'ऐका! आपण वर यरुशलेमात जात आहोत आणि सदेष्टयांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते सर्व पूर्ण होईल.
Luke 21:22 in Marathi 22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
Luke 22:37 in Marathi 37 मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयींच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.
Luke 24:6 in Marathi 6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालीलात असताना त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा.
Luke 24:26 in Marathi 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?
Luke 24:46 in Marathi 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे,
John 3:14 in Marathi 14 जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाहि उंच केले पाहिजे,
John 5:39 in Marathi 39 तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
John 5:46 in Marathi 46 कारण तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.
John 16:4 in Marathi 4 “ मी तुम्हाला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या ह्याची आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी तुम्हाला, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.
John 16:16 in Marathi 16 “थोड्या वेळाने,मी तुम्हाला दिसणार नाही; आणि पुन्हा, थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
John 17:11 in Marathi 11 आणि आता, ह्यापुढे मी जगात नाही; पण ते जगांत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
John 19:24 in Marathi 24 म्हणून ते आपआपल्यात म्हणाले, “आपण हा फाडू नये; पण तो कोणाला मिळेल हे त्याकरता चिठ्या टाकून पाहावे.” हे ह्यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसांत वांटून घेतले, आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्या टाकिल्या,’ असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी ह्या गोष्टी केल्या.
Acts 3:18 in Marathi 18 परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी म्हणून देवाने आपल्या सर्व भविष्यवाद्यांच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
Acts 3:22 in Marathi 22 मोशेने तर सांगितले की, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावांमधून उठवील, तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका.
Acts 7:37 in Marathi 37 तोच मोशे इस्त्राएल लोकांना म्हणाला, परमेश्वर तुमच्या बांधवामधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.
Acts 13:29 in Marathi 29 शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते. ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले. व त्याला कबरेत ठेवले.
Acts 13:33 in Marathi 33 आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याव्दारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुध्दा वाचतोः‘तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे.’
Acts 17:2 in Marathi 2 तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला.
1 Corinthians 15:3 in Marathi 3 कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले,त्यापैकी महत्वाचे हे आहे की, शास्त्रवचनाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांसाठी मरण पावला
Hebrews 3:5 in Marathi 5 देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या , त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली.
Hebrews 7:1 in Marathi 1 हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने त्याला आशीर्वाद दिला.
Hebrews 9:8 in Marathi 8 याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही.
Hebrews 10:1 in Marathi 1 कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.
1 Peter 1:11 in Marathi 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”