John 7:28 in Marathi 28 ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरी पण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्याला तुम्ही ओळखत नाही.
Other Translations King James Version (KJV) Then cried Jesus in the temple as he taught, saying, Ye both know me, and ye know whence I am: and I am not come of myself, but he that sent me is true, whom ye know not.
American Standard Version (ASV) Jesus therefore cried in the temple, teaching and saying, Ye both know me, and know whence I am; and I am not come of myself, but he that sent me is true, whom ye know not.
Bible in Basic English (BBE) Then, when he was teaching in the Temple, Jesus said with a loud voice, You have knowledge of me and you have knowledge of where I come from; and I have not come of myself; but there is One who has sent me; he is true, but you have no knowledge of him.
Darby English Bible (DBY) Jesus therefore cried out in the temple, teaching and saying, Ye both know me and ye know whence I am; and I am not come of myself, but he that sent me is true, whom ye do not know.
World English Bible (WEB) Jesus therefore cried out in the temple, teaching and saying, "You both know me, and know where I am from. I have not come of myself, but he who sent me is true, whom you don't know.
Young's Literal Translation (YLT) Jesus cried, therefore, in the temple, teaching and saying, `Ye have both known me, and ye have known whence I am; and I have not come of myself, but He who sent me is true, whom ye have not known;
Cross Reference Matthew 2:23 in Marathi 23 व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की,”त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्टयांच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे.
Matthew 11:27 in Marathi 27 “माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
Luke 2:4 in Marathi 4 मग योसेफसुध्दा गालीलातील नासरेथ गांवाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.
Luke 2:11 in Marathi 11 आज तुमच्या साठी दावीदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे ! तो ख्रिस्त प्रभू आहे.
Luke 2:39 in Marathi 39 जेव्हा त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पूर्ण केल्यावर, ते गालीलातील आपले गाव नासरेथ येथे परत गेले.
Luke 2:51 in Marathi 51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंत:करणात जपून ठेवल्या.
Luke 10:22 in Marathi 22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.
John 1:46 in Marathi 46 नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिल्लीपाने त्याला म्हणाला, “येऊन पाहा.”
John 3:2 in Marathi 2 तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “गुरूजी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहा हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहा ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
John 3:33 in Marathi 33 ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ ह्यावर आपला शिक्का लावला आहे.
John 5:32 in Marathi 32 माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि मला माहीत आहे की, माझ्याविषयी तो साक्ष देतो ती साक्ष खरी आहे.
John 5:43 in Marathi 43 मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही; दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल.
John 7:14 in Marathi 14 मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला.
John 8:14 in Marathi 14 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हाला माहीत नाही.
John 8:16 in Marathi 16 आणि जरी मी कोणाचा न्याय करतो, तरी माझा न्याय खरा आहे. कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे.
John 8:19 in Marathi 19 ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखीत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
John 8:26 in Marathi 26 मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्या कडून एेकल्या त्या मी जगाला सांगतो.‘
John 8:42 in Marathi 42 येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो, मी स्वतः होऊन आलो नाही, पण त्याने मला पाठवले.
John 8:54 in Marathi 54 येशूने उत्तर दिले, “मी स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही, माझे गौरव करणारा माझा पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता.
John 10:36 in Marathi 36 तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले,त्या मला,मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?
John 12:49 in Marathi 49 कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.
John 14:10 in Marathi 10 मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.
John 14:31 in Marathi 31 परंतु मी पित्यावर प्रीती करतो, आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने आेळखावे म्हणून असे होते.उठा, आपण येथून जाऊ.
John 16:3 in Marathi 3 त्यांनी पित्याला आणि मलाहि ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
John 17:25 in Marathi 25 हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे .
Acts 17:23 in Marathi 23 कारण मी फिरता फिरता तुमच्या वस्तु पाहतांना , अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हास जाहीर करतो.
Romans 1:28 in Marathi 28 आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
Romans 3:4 in Marathi 4 कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
2 Corinthians 1:18 in Marathi 18 पण जसा देव विश्वासनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
Titus 1:2 in Marathi 2 जे युगांनुयुगाचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने अनंतकाळापूर्वी देऊ केले, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,
Hebrews 6:18 in Marathi 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
1 John 2:3 in Marathi 3 जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्याला खऱ्या अर्थाने ओळखले आहे.
1 John 5:10 in Marathi 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.