John 10 in Marathi

1 “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यांत दारातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे

2 जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे.

3 त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो;

4 आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो, आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.

5 ती परक्याच्या मागें कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहींत.”

6 येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.

7 म्हणून येशू त्यांना पुन्हा ,म्हणाला मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.

8 जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही.

9 मी दार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल, आणि त्याला खावयास मिळेल.

10 चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे .

11 मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.

12 जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.

13 मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे, आणि त्याला मेंढरांची काळजी नाही.

14 मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो, आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.

16 ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत;तीहि मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

17 मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.

18 कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे, आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”

19 म्हणून ह्या शब्दांवरून यहुद्यांत पुन्हा फूट पडली .

20 त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे, आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?”

21 दुसरे म्हणाले, “ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”

22 तेव्हा यरुशलेमेंत पुनःस्थापनेचा सण असून हिंवाळा होता.

23 आणि येशू मंदिरात शलमोनाच्या देवडीत फिरत होता .

24 म्हणून यहूदी त्याच्या भोवती जमले आणि त्याला म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.”

25 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामें करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात .

26 तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.

27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.

28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.

29 पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे, आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही .

30 मी आणि पिता एक आहो.”

31 तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.

32 येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या पित्याकडची पुष्कळ चांगली कामें तुम्हाला दाखवलीत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?”

33 यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी; आणि, कारण तू मनुष्य असून तू स्वतःला देव म्हणवितो.”

34 येशूने त्यांना म्हटले, ‘तुम्ही देव आहा’, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?

35 ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,

36 तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले,त्या मला,मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?

37 मी जर माझ्या पित्याची कामें करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.

38 पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे.”हे तुम्ही आेळखून घ्यावे.

39 ते त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.

40 मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी जाऊन राहिला.

41 तेव्हा पुष्कळ लोक आले;ते म्हणाले,, “योहानाने काही चिन्ह केले नाही, खरे तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”

42 तेथे पुष्कळ जणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.