Ephesians 2:12 in Marathi 12 त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे केलेले होता, इस्राएलातून तुम्हाला परके केलेले, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाहीन आणि देवाशिवाय या जगात होता.
Other Translations King James Version (KJV) That at that time ye were without Christ, being aliens from the commonwealth of Israel, and strangers from the covenants of promise, having no hope, and without God in the world:
American Standard Version (ASV) that ye were at that time separate from Christ, alienated from the commonwealth of Israel, and strangers from the covenants of the promise, having no hope and without God in the world.
Bible in Basic English (BBE) That you were at that time without Christ, being cut off from any part in Israel's rights as a nation, having no part in God's agreement, having no hope, and without God in the world.
Darby English Bible (DBY) that ye were at that time without Christ, aliens from the commonwealth of Israel, and strangers to the covenants of promise, having no hope, and without God in the world:
World English Bible (WEB) that you were at that time separate from Christ, alienated from the commonwealth of Israel, and strangers from the covenants of the promise, having no hope and without God in the world.
Young's Literal Translation (YLT) that ye were at that time apart from Christ, having been alienated from the commonwealth of Israel, and strangers to the covenants of the promise, having no hope, and without God, in the world;
Cross Reference Luke 1:72 in Marathi 72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे. व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,
John 4:22 in Marathi 22 तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे.
John 10:16 in Marathi 16 ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत;तीहि मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
John 15:5 in Marathi 5 मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करितां येत नाही.
Acts 3:25 in Marathi 25 तुम्ही भविष्यवाद्यांचे मुले आहा, आणि तुझ्या संततीव्दारे पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला, त्या कराराची तुम्ही मुले आहा.
Acts 14:15 in Marathi 15 लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हाला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
Acts 28:20 in Marathi 20 या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली. कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळ्यांनी जखडलो गेलो आहे.”
Romans 1:28 in Marathi 28 आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
Romans 9:4 in Marathi 4 ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव आणि करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.
Romans 9:8 in Marathi 8 म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
1 Corinthians 8:4 in Marathi 4 म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही, आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,
1 Corinthians 10:19 in Marathi 19 तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे?
Galatians 3:16 in Marathi 16 आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.
Galatians 4:8 in Marathi 8 तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता;
Ephesians 4:18 in Marathi 18 “त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत.”
Colossians 1:5 in Marathi 5 जी आशा तुमच्यासाठी आकाशात ठेवली आहे ह्या आशेविषयी,तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले.
Colossians 1:21 in Marathi 21 आणि तुम्ही जे एकदा परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
1 Thessalonians 4:5 in Marathi 5 देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये.
1 Thessalonians 4:13 in Marathi 13 पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे, ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
1 Timothy 1:1 in Marathi 1 देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून
Hebrews 6:18 in Marathi 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
Hebrews 11:34 in Marathi 34 त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तरवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
1 Peter 1:21 in Marathi 21 आणि त्याच्या द्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण, देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्याला मृतांतून उठवून गौरव दिला.
1 Peter 3:15 in Marathi 15 पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्या प्रत्येक मनुष्याला सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.
1 John 3:3 in Marathi 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुध्द आहे, तसा तो आपणाला शुध्द करतो