Ephesians 2 in Marathi

1 “आणि तुम्ही आपले अपराध आणि पातके यामुळे मेला होता. “

2 “ज्यामध्ये तुम्ही पूर्वी या जगाच्या चालिरीतीप्रमाणे चालत व रहात होता, आकाशातील राज्याचा अधिकारी जो सैतान, आज्ञा मोडणाऱ्या पुत्रांच्या आत्म्यात कार्य करणाऱ्या अधिपती प्रमाणे चालत होता. . “

3 “ आम्ही सर्व यापूर्वी ह्या अविश्वासणाऱ्या मध्ये आपल्या शारीरीक दुष्टवासनेने वागत होतो, दैहिक आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो, व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची मुले होतो.

4 “पण देव खूप दयाळू आहे. कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.”

5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.

6 “आणि आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या आसनावर बसविले.

7 “देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या महान कृपेची अपार समृध्दी दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हाविषयीची ममता व्यक्त करावी.

8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे देवापासूनचे दान आहे,

9 आपल्या कामामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. “

10 कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अारभीच याेजून ठेवले होते. यासाठी त्याप्रमाणे आम्ही चालावे.

11 म्हणून आठवण करा, एके काळी तुम्ही देहाने परराष्ट्रीय होता,आणि ज्यांची देहाची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.

12 त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे केलेले होता, इस्राएलातून तुम्हाला परके केलेले, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाहीन आणि देवाशिवाय या जगात होता.

13 “पण आता, येशू ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.”

14 “कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि परराष्ट्रीय या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हाला एकमेकापासून दुभागणारी वैराची, मधली आडभिंत त्याने पाडून टाकली.”

15 त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मानव निर्माण करून शांती करावी.

16 त्याने वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात त्या दोघांचा देवाबरोबर समेट करावा.

17 येशू आला आणि त्याने जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला व जे तुम्ही जवळ होता त्या तुम्हालाही शांतीची सुवार्ता सांगितली.

18 “ कारण येशूच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्यात पित्याजवळ प्रवेश होतो.

19 यामुळे, तुम्ही आता परके आणि परराष्ट्रीय नाहीत. तर त्याएेवजी तुम्ही पवित्र जनांच्या बरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात

20 “तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. “

21 संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. “

22 त्याच्यामध्ये तुम्हीसुध्दा इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.