Romans 6:4 in Marathi 4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की, जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मेलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे.
Other Translations King James Version (KJV) Therefore we are buried with him by baptism into death: that like as Christ was raised up from the dead by the glory of the Father, even so we also should walk in newness of life.
American Standard Version (ASV) We were buried therefore with him through baptism unto death: that like as Christ was raised from the dead through the glory of the Father, so we also might walk in newness of life.
Bible in Basic English (BBE) We have been placed with him among the dead through baptism into death: so that as Christ came again from the dead by the glory of the Father, we, in the same way, might be living in new life.
Darby English Bible (DBY) We have been buried therefore with him by baptism unto death, in order that, even as Christ has been raised up from among [the] dead by the glory of the Father, so *we* also should walk in newness of life.
World English Bible (WEB) We were buried therefore with him through baptism to death, that just like Christ was raised from the dead through the glory of the Father, so we also might walk in newness of life.
Young's Literal Translation (YLT) we were buried together, then, with him through the baptism to the death, that even as Christ was raised up out of the dead through the glory of the Father, so also we in newness of life might walk.
Cross Reference Matthew 28:2 in Marathi 2 त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
John 2:11 in Marathi 11 येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले, आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
John 2:19 in Marathi 19 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले. “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.”
John 11:40 in Marathi 40 येशूने तिला म्हटले, “ तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
Acts 2:24 in Marathi 24 त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले ,कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
Romans 6:3 in Marathi 3 किंवा, आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूत बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय?
Romans 6:9 in Marathi 9 कारण आपण हे जाणतो की, मेलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता राहिली नाही
Romans 6:19 in Marathi 19 मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो. कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.
Romans 7:6 in Marathi 6 पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्याला आपण मेलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
Romans 8:11 in Marathi 11 पण ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्या, आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमचीही मर्त्य शरिरे जिवंत करील.
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Romans 13:13 in Marathi 13 दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.
1 Corinthians 6:14 in Marathi 14 आणि देवाने प्रभूला उठवले , आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुध्दा उठवील.
2 Corinthians 5:17 in Marathi 17 म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
2 Corinthians 13:4 in Marathi 4 कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे. कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
Galatians 6:15 in Marathi 15 कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही,तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय.
Ephesians 1:19 in Marathi 19 “आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय ते तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून आेळखून घ्यावे .
Ephesians 2:5 in Marathi 5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.
Ephesians 4:17 in Marathi 17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
Ephesians 4:22 in Marathi 22 तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,
Ephesians 5:8 in Marathi 8 कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.
Philippians 3:17 in Marathi 17 बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.
Colossians 1:9 in Marathi 9 म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडू न देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की,तुम्हाला सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुध्दी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
Colossians 2:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे.
Colossians 3:1 in Marathi 1 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहा तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.
Colossians 3:10 in Marathi 10 आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माण करणार्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे,त्याला तुम्ही परिधान केले आहे.
Colossians 4:1 in Marathi 1 धन्यांनो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षांत ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा;
1 Peter 3:21 in Marathi 21 आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा (देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो.
1 Peter 4:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
2 Peter 1:4 in Marathi 4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत;ह्यासाठी की,त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे भागीदार व्हावे.
1 John 2:6 in Marathi 6 मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशूख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.