Romans 6:13 in Marathi 13 आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मेलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.
Other Translations King James Version (KJV) Neither yield ye your members as instruments of unrighteousness unto sin: but yield yourselves unto God, as those that are alive from the dead, and your members as instruments of righteousness unto God.
American Standard Version (ASV) neither present your members unto sin `as' instruments of unrighteousness; but present yourselves unto God, as alive from the dead, and your members `as' instruments of righteousness unto God.
Bible in Basic English (BBE) And do not give your bodies to sin as the instruments of wrongdoing, but give yourselves to God, as those who are living from the dead, and your bodies as instruments of righteousness to God.
Darby English Bible (DBY) Neither yield your members instruments of unrighteousness to sin, but yield yourselves to God as alive from among [the] dead, and your members instruments of righteousness to God.
World English Bible (WEB) Neither present your members to sin as instruments of unrighteousness, but present yourselves to God, as alive from the dead, and your members as instruments of righteousness to God.
Young's Literal Translation (YLT) neither present ye your members instruments of unrighteousness to the sin, but present yourselves to God as living out of the dead, and your members instruments of righteousness to God;
Cross Reference Luke 15:24 in Marathi 24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करू लागले.
Luke 15:32 in Marathi 32 परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
Romans 1:29 in Marathi 29 ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे,
Romans 2:8 in Marathi 8 परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना क्रोध व कोप,
Romans 6:11 in Marathi 11 तसेच, आपण ख्रिस्त येशूत खरोखर पापाला मेलेले, पण देवाला जिवंत आहोत, असे तुम्ही स्वतःला माना.
Romans 6:16 in Marathi 16 तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहा. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय?
Romans 6:19 in Marathi 19 मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो. कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.
Romans 7:5 in Marathi 5 कारण आपण देहाधीन असतेवेळी, नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.
Romans 7:23 in Marathi 23 पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
1 Corinthians 6:9 in Marathi 9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,
1 Corinthians 6:15 in Marathi 15 तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो.
1 Corinthians 6:20 in Marathi 20 कारण तुम्हाला मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
2 Corinthians 5:15 in Marathi 15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
2 Corinthians 8:5 in Marathi 5 आम्हाला आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले.
2 Corinthians 10:4 in Marathi 4 कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत_ चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.
Ephesians 2:5 in Marathi 5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.
Ephesians 5:14 in Marathi 14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो. म्हणून असे म्हटले आहे “हे झोपलेल्या जागा हो, अाणि मेलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल”.
Philippians 1:20 in Marathi 20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराव्दारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
Colossians 2:13 in Marathi 13 आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मेलेले होता त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे;
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
2 Thessalonians 2:12 in Marathi 12 ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.
James 3:5 in Marathi 5 त्याचप्रमाणे जिभ एक लहान अवयव आहे, आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते.
James 4:1 in Marathi 1 तुमच्यात लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?
1 Peter 2:24 in Marathi 24 त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, हयासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत रहावे; त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
2 Peter 2:13 in Marathi 13 त्यांचे वाईट होईल ह्यात त्यांना त्यांच्या वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल. ते दिवसाच्या ख्यालीखुशालीत सुख मानतात; ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर ते जेवतात तेव्हा ते दंगली करून मजा करतात.
1 John 1:9 in Marathi 9 जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे.म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील.