Matthew 7:21 in Marathi 21 “जो कोणी मला वरवर प्रभू, प्रभू म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल.
Other Translations King James Version (KJV) Not every one that saith unto me, Lord, Lord, shall enter into the kingdom of heaven; but he that doeth the will of my Father which is in heaven.
American Standard Version (ASV) Not every one that saith unto me, Lord, Lord, shall enter into the kingdom of heaven; but he that doeth the will of my Father who is in heaven.
Bible in Basic English (BBE) Not everyone who says to me, Lord, Lord, will go into the kingdom of heaven; but he who does the pleasure of my Father in heaven.
Darby English Bible (DBY) Not every one who says to me, Lord, Lord, shall enter into the kingdom of the heavens, but he that does the will of my Father who is in the heavens.
World English Bible (WEB) Not everyone who says to me, 'Lord, Lord,' will enter into the Kingdom of Heaven; but he who does the will of my Father who is in heaven.
Young's Literal Translation (YLT) `Not every one who is saying to me Lord, lord, shall come into the reign of the heavens; but he who is doing the will of my Father who is in the heavens.
Cross Reference Matthew 10:32 in Marathi 32 “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुध्दा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.
Matthew 12:50 in Marathi 50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”
Matthew 16:17 in Marathi 17 येशू म्हणाला, “शिमोन, बार्येाना, तू आशीर्वादित आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
Matthew 18:3 in Marathi 3 आणि म्हटले, “मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
Matthew 18:10 in Marathi 10 “सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका.कारण मी तुम्हाला सांगतो की,स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
Matthew 18:19 in Marathi 19 “तसेच मी तुम्हाला सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल;.
Matthew 18:35 in Marathi 35 “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”
Matthew 19:24 in Marathi 24 मी तुम्हाला सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.”
Matthew 21:29 in Marathi 29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला.
Matthew 25:11 in Marathi 11 “नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, ‘प्रभूजी!प्रभूजी!आमच्यासाठी दार उघडा!
Matthew 25:21 in Marathi 21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
Matthew 26:42 in Marathi 42 नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”
Mark 3:35 in Marathi 35 जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”
Mark 10:23 in Marathi 23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.”
Luke 6:46 in Marathi 46 तुम्ही मला प्रभू, प्रभू, म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही?
Luke 11:28 in Marathi 28 परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे आशीर्वादित!”
Luke 13:25 in Marathi 25 घराच्या मालकाने उठून दार बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, प्रभू, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.
Luke 18:25 in Marathi 25 'होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.'
John 3:5 in Marathi 5 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
John 5:17 in Marathi 17 येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अाजपर्यंत काम करीत आहे, आणि मीही काम करीत आहे.”
John 6:40 in Marathi 40 माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”
John 7:17 in Marathi 17 जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगिल त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.
John 10:29 in Marathi 29 पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे, आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही .
John 14:7 in Marathi 7 मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाहि ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेहि आहे.”
John 15:23 in Marathi 23 जो माझा व्देष करतो तो माझ्या पित्याचाही व्देष करतो.
Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Acts 19:13 in Marathi 13 काही यहूदी सुध्दा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत. ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तिमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत.
Romans 2:13 in Marathi 13 कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.
Romans 12:2 in Marathi 2 आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची, उत्तम व त्याला संतोष देणारी, परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
Ephesians 6:6 in Marathi 6 मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा,
Colossians 4:12 in Marathi 12 ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्यें सर्वदा तुम्हांसाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे.
1 Thessalonians 4:3 in Marathi 3 कारण देवाची इच्छा ही आहे की,तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दुर राहावे
1 Thessalonians 5:18 in Marathi 18 प्रत्येक गोष्टींत उपकार माना. कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
Titus 1:16 in Marathi 16 ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्याला नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे, आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
Hebrews 4:6 in Marathi 6 ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.
Hebrews 13:21 in Marathi 21 त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला सदासर्वकाल र्गौरव असो. आमेन.
James 1:22 in Marathi 22 वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
James 2:20 in Marathi 20 परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय?
1 Peter 2:15 in Marathi 15 कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुध्द माणसांच्या अज्ञानाला गप्प करावे.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
1 John 3:21 in Marathi 21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हाला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हाला धैर्य आहे.
Revelation 2:27 in Marathi 27 आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहडंडाने त्यांचावर अधिकार गाजवील .
Revelation 3:5 in Marathi 5 जो विजय मिळवतो, तो अशारीतीने पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
Revelation 22:14 in Marathi 14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा अधिकार राहील.