Matthew 6:2 in Marathi 2 म्हणून जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हाला खचीत सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे.
Other Translations King James Version (KJV) Therefore when thou doest thine alms, do not sound a trumpet before thee, as the hypocrites do in the synagogues and in the streets, that they may have glory of men. Verily I say unto you, They have their reward.
American Standard Version (ASV) When therefore thou doest alms, sound not a trumpet before thee, as the hypocrites do in the synagogues and in the streets, that they may have glory of men. Verily I say unto you, They have received their reward.
Bible in Basic English (BBE) When then you give money to the poor, do not make a noise about it, as the false-hearted men do in the Synagogues and in the streets, so that they may have glory from men. Truly, I say to you, They have their reward.
Darby English Bible (DBY) When therefore thou doest alms, sound not a trumpet before thee, as the hypocrites do in the synagogues and in the streets, so that they may have glory from men. Verily I say unto you, They have their reward.
World English Bible (WEB) Therefore when you do merciful deeds, don't sound a trumpet before yourself, as the hypocrites do in the synagogues and in the streets, that they may get glory from men. Most assuredly I tell you, they have received their reward.
Young's Literal Translation (YLT) whenever, therefore, thou mayest do kindness, thou mayest not sound a trumpet before thee as the hypocrites do, in the synagogues, and in the streets, that they may have glory from men; verily I say to you -- they have their reward!
Cross Reference Matthew 5:18 in Marathi 18 कारण मी तुम्हास खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी हीं नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रांतील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
Matthew 6:5 in Marathi 5 “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकास दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 6:16 in Marathi 16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 7:5 in Marathi 5 अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.
Matthew 15:7 in Marathi 7 अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
Matthew 16:3 in Marathi 3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हाला आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत?
Matthew 22:18 in Marathi 18 येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात?
Matthew 23:6 in Marathi 6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते.
Matthew 23:13 in Marathi 13 “अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो,तुम्हाला हाय हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
Matthew 24:51 in Marathi 51 मग मालक त्या नोकराचे तुकडे करील. त्या नोकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.
Mark 7:6 in Marathi 6 येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ''हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.''
Mark 12:39 in Marathi 39 आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते.
Luke 6:24 in Marathi 24 'पण श्रीमंतानो, तुम्हाला दु:ख होवो कारण तुम्हाला अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
Luke 6:42 in Marathi 42 अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे ? अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.
Luke 11:41 in Marathi 41 पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
Luke 11:43 in Marathi 43 तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते.
Luke 12:33 in Marathi 33 तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतः:साठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही.
Luke 12:56 in Marathi 56 अहो ढोंग्यांनो! तुम्हाला पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणें पारखतां येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हाला का काढता येत नाही काय?”
Luke 13:15 in Marathi 15 येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?
Luke 20:46 in Marathi 46 त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते.
John 5:41 in Marathi 41 मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही.
John 5:44 in Marathi 44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता, आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
John 7:18 in Marathi 18 जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचेच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
John 13:29 in Marathi 29 कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे,असे कित्येकांस वाटले.
Acts 9:36 in Marathi 36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
Acts 10:2 in Marathi 2 कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
Acts 10:4 in Marathi 4 कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला “काय आहे, प्रभू?”देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे.
Acts 10:31 in Marathi 31 तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो.
Acts 11:29 in Marathi 29 विश्वासणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनीना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.
Acts 24:17 in Marathi 17 मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.
Romans 12:8 in Marathi 8 किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
2 Corinthians 9:6 in Marathi 6 हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील.
Galatians 2:10 in Marathi 10 मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती.
Ephesians 4:28 in Marathi 28 जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.
1 Thessalonians 2:6 in Marathi 6 आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हाला आपला विशेष अधीकार चालवता आला असता तरी आम्ही माणसांपासून, तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीत नव्हतो;
1 Timothy 6:18 in Marathi 18 चांगले ते करावे , चांगल्या कृत्यात धनवान ,उदार व परोपकारी असावे.
Philemon 1:7 in Marathi 7 कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे; कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत.
Hebrews 13:16 in Marathi 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
James 2:15 in Marathi 15 जर कोणी भाऊ उघडा असेल, किंवा कोणी बहीण उघडी असेल, आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल,
1 Peter 4:11 in Marathi 11 जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्याला गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.
1 John 3:17 in Marathi 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो?