Matthew 6:13 in Marathi 13 आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला त्या दुष्टापासून सोडव.’ कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहेत.
Other Translations King James Version (KJV) And lead us not into temptation, but deliver us from evil: For thine is the kingdom, and the power, and the glory, for ever. Amen.
American Standard Version (ASV) And bring us not into temptation, but deliver us from the evil `one.'
Bible in Basic English (BBE) And let us not be put to the test, but keep us safe from the Evil One.
Darby English Bible (DBY) and lead us not into temptation, but save us from evil.
World English Bible (WEB) Bring us not into temptation, but deliver us from the evil one. For yours is the Kingdom, the power, and the glory forever. Amen.'
Young's Literal Translation (YLT) `And mayest Thou not lead us to temptation, but deliver us from the evil, because Thine is the reign, and the power, and the glory -- to the ages. Amen.
Cross Reference Matthew 5:37 in Marathi 37 तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.
Matthew 6:10 in Marathi 10 तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
Matthew 26:41 in Marathi 41 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे”.
Matthew 28:20 in Marathi 20 आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना पाळायला शिकवा. आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”
Luke 22:31 in Marathi 31 शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
John 17:15 in Marathi 15 तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
1 Corinthians 10:13 in Marathi 13 जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हाला पकडले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हाला सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हाला सहन करणे शक्य होईल.
1 Corinthians 14:16 in Marathi 16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही.
2 Corinthians 1:20 in Marathi 20 कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
2 Corinthians 12:7 in Marathi 7 आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे, मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये, म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
2 Thessalonians 3:3 in Marathi 3 प्रभू, विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील, व त्या दुष्टापासून राखील.
1 Timothy 1:17 in Marathi 17 आता सर्वकालचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.
1 Timothy 6:15 in Marathi 15 जोे धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,
2 Timothy 4:17 in Marathi 17 प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी. आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.
Hebrews 2:14 in Marathi 14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला,येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
Hebrews 11:36 in Marathi 36 आणखी दुसर्यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला.
1 Peter 5:8 in Marathi 8 सावध रहा; जागृत रहा; कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावेे म्हणून शोधीत फिरतो.
2 Peter 2:9 in Marathi 9 तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.
1 John 3:8 in Marathi 8 जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
1 John 5:18 in Marathi 18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही.
Revelation 1:18 in Marathi 18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 3:10 in Marathi 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हाला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.
Revelation 3:14 in Marathi 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो आमेन , विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
Revelation 5:13 in Marathi 13 प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो सिंहासनावर बसतो त्याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असो!”
Revelation 7:14 in Marathi 14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.
Revelation 19:1 in Marathi 1 ह्या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली, ‘हालेलूया! तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाची आहेत,
Revelation 19:4 in Marathi 4 तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणाले, ‘आमेन, हालेलूया. !’
Revelation 21:4 in Marathi 4 तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल, आणि ह्यापुढे मरण राहणार नाही, दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. ’