Matthew 16:27 in Marathi 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
Other Translations King James Version (KJV) For the Son of man shall come in the glory of his Father with his angels; and then he shall reward every man according to his works.
American Standard Version (ASV) For the Son of man shall come in the glory of his Father with his angels; and then shall he render unto every man according to his deeds.
Bible in Basic English (BBE) For the Son of man will come in the glory of his Father with his angels; and then he will give to every man the reward of his works.
Darby English Bible (DBY) For the Son of man is about to come in the glory of his Father with his angels, and then he will render to each according to his doings.
World English Bible (WEB) For the Son of Man will come in the glory of his Father with his angels, and then he will render to everyone according to his deeds.
Young's Literal Translation (YLT) `For, the Son of Man is about to come in the glory of his Father, with his messengers, and then he will reward each, according to his work.
Cross Reference Matthew 8:20 in Marathi 20 येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशांतील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.
Matthew 10:41 in Marathi 41 जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल, आणि नितीमानाला नितीमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नितीमानाचे प्रतिफळ मिळेल
Matthew 13:41 in Marathi 41 मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील, आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना’ जमा करील,
Matthew 13:49 in Marathi 49 तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील.
Matthew 24:30 in Marathi 30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.
Matthew 25:31 in Marathi 31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.
Matthew 26:64 in Marathi 64 येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हाला सांगतोः ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.”
Mark 8:38 in Marathi 38 या देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
Mark 14:62 in Marathi 62 येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
Luke 9:26 in Marathi 26 जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयींची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या व बापाच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
Luke 21:27 in Marathi 27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील.
Luke 22:69 in Marathi 69 पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.
Acts 1:11 in Marathi 11 ते म्हणाले अहो गालीलकारांनो ,तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जातांना पाहिले, तसाच परत येईल.
Romans 2:6 in Marathi 6 तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल.
Romans 14:12 in Marathi 12 तर मग आपल्यातला प्रत्येक जण देवाला आपआपला हिशोब देईल.
1 Corinthians 8:8 in Marathi 8 पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही, किंवा खाण्याने अधिक ठरत नाही.
2 Corinthians 5:10 in Marathi 10 कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्याला त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
Ephesians 6:8 in Marathi 8 प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो,तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्याला प्रतिफळ प्राप्त होईल.
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
1 Thessalonians 4:16 in Marathi 16 कारण आज्ञाध्वनि, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मेलेले प्रथम उठतील.
2 Thessalonians 1:7 in Marathi 7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देव दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
1 Peter 1:17 in Marathi 17 आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्याला तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहीजे.
Jude 1:14 in Marathi 14 आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही ह्यांच्याविषयी संदेश देऊन म्हटले आहे की, ‘बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.
Revelation 1:7 in Marathi 7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेसुध्दा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, होय, असेच होईल! आमेन.
Revelation 2:23 in Marathi 23 तर मी तिच्या मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे . मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन.
Revelation 20:12 in Marathi 12 मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; आणि तेव्हा पुस्तके उघडली गेली. नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.
Revelation 22:12 in Marathi 12 “पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्यातय कामाप्रमाणे मी फळ देईन.