Hebrews 6:4 in Marathi 4 कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत,
Other Translations King James Version (KJV) For it is impossible for those who were once enlightened, and have tasted of the heavenly gift, and were made partakers of the Holy Ghost,
American Standard Version (ASV) For as touching those who were once enlightened and tasted of the heavenly gift, and were made partakers of the Holy Spirit,
Bible in Basic English (BBE) As for those who at one time saw the light, tasting the good things from heaven, and having their part in the Holy Spirit,
Darby English Bible (DBY) For it is impossible to renew again to repentance those once enlightened, and who have tasted of the heavenly gift, and have been made partakers of [the] Holy Spirit,
World English Bible (WEB) For concerning those who were once enlightened and tasted of the heavenly gift, and were made partakers of the Holy Spirit,
Young's Literal Translation (YLT) for `it is' impossible for those once enlightened, having tasted also of the heavenly gift, and partakers having became of the Holy Spirit,
Cross Reference Matthew 5:13 in Marathi 13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? तर ते निरूपयोगी होऊन फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.
Matthew 7:21 in Marathi 21 “जो कोणी मला वरवर प्रभू, प्रभू म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल.
Matthew 12:31 in Marathi 31 “म्हणून मी तुम्हाला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूध्द बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही.
Matthew 12:45 in Marathi 45 नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.”
Luke 10:19 in Marathi 19 पाहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हाला अपाय होणार नाही.
Luke 11:24 in Marathi 24 जेव्हा भूत मनुष्याबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांती मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, “मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’
John 3:27 in Marathi 27 योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
John 4:10 in Marathi 10 येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”
John 6:32 in Marathi 32 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो.
John 15:6 in Marathi 6 कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.
Acts 8:20 in Marathi 20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास!
Acts 10:45 in Marathi 45 यहूदी सुंता झालेले विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुध्दा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले.
Acts 11:17 in Marathi 17 आपण येशू रिव्रस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले. मग देवाला अडविणारा असा मी कोण?”
Acts 15:8 in Marathi 8 आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
Romans 1:11 in Marathi 11 कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान दयावे हयासाठी मी तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहे;
1 Corinthians 13:1 in Marathi 1 मी मनुष्यांच्या आणि व देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
Galatians 3:2 in Marathi 2 तुम्हाला जो आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी की, विश्वासापूर्वक ऐकल्यामुळे मिळाला,इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे.
Galatians 3:5 in Marathi 5 म्हणून जो तुम्हाला आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, विश्वासपूर्वक ऐकल्यामुळे?
Ephesians 2:8 in Marathi 8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे देवापासूनचे दान आहे,
Ephesians 3:7 in Marathi 7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
Ephesians 4:7 in Marathi 7 ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान दिलेले आहे.”
1 Timothy 4:14 in Marathi 14 तुझ्या वर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशांच्या द्वारे देण्यांत आलेले असे जे कृपादान तुझ्या मध्ये आहे , त्याकडे दुर्लक्ष करू नको जे.
2 Timothy 2:25 in Marathi 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप कण्याची बुद्धी देईल.
2 Timothy 4:14 in Marathi 14 आलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील.
Hebrews 2:4 in Marathi 4 देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
Hebrews 10:26 in Marathi 26 सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.
Hebrews 10:32 in Marathi 32 ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली.
Hebrews 12:15 in Marathi 15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊन व इतर लोकांची मने अशुध्द करू नये, म्हणून जपा.
James 1:17 in Marathi 17 प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी वरून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.
2 Peter 2:20 in Marathi 20 कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.
1 John 5:16 in Marathi 16 जर एखाद्याला त्याचा बंधूला पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्याला जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.