Hebrews 6:12 in Marathi 12 आम्हाला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
Other Translations King James Version (KJV) That ye be not slothful, but followers of them who through faith and patience inherit the promises.
American Standard Version (ASV) that ye be not sluggish, but imitators of them who through faith and patience inherit the promises.
Bible in Basic English (BBE) So that you may not be slow in heart, but may take as your example those to whom God has given their heritage, because of their faith and their long waiting.
Darby English Bible (DBY) that ye be not sluggish, but imitators of those who through faith and patience have been inheritors of the promises.
World English Bible (WEB) that you won't be sluggish, but imitators of those who through faith and patience inherited the promises.
Young's Literal Translation (YLT) that ye may not become slothful, but followers of those who through faith and patient endurance are inheriting the promises.
Cross Reference Matthew 22:32 in Marathi 32 ते असे की, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ तो मेलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.”
Matthew 25:26 in Marathi 26 “मालकाने उत्तर दिले, ‘अरे वाईट आणि आळशी नोकरा! मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.
Luke 8:15 in Marathi 15 पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत्, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात, आणि धीराने पीक देत जातात.
Luke 16:22 in Marathi 22 मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहांमाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले.
Luke 20:37 in Marathi 37 जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वाराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुध्दा उठवले जातात हे दाखवून दिले.
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 4:12 in Marathi 12 आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासाला अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.
Romans 8:25 in Marathi 25 पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.
Romans 12:11 in Marathi 11 कामात आळशी न होता, आत्म्यात उत्तेजित होऊन, प्रभूची सेवा करणारे व्हा.
1 Thessalonians 1:3 in Marathi 3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेला सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
2 Thessalonians 1:4 in Marathi 4 ह्या वरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमची प्रशंसा करतो.
Hebrews 1:14 in Marathi 14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?
Hebrews 5:11 in Marathi 11 याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हाला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहा.
Hebrews 6:15 in Marathi 15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.
Hebrews 10:36 in Marathi 36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हाला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.
Hebrews 11:8 in Marathi 8 विश्वासाने, अब्राहामाने, त्याला जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्याला बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्याला माहीत नसताना तो निघाला.
Hebrews 11:33 in Marathi 33 विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्व आचरली, वचने मिळवली, सिहांची तोंडे बंद केली.
Hebrews 12:1 in Marathi 1 म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
Hebrews 13:7 in Marathi 7 ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा. व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
James 1:3 in Marathi 3 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.
James 5:10 in Marathi 10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीराविषयी उदाहरण घ्या.
1 Peter 3:5 in Marathi 5 कारण देवावर आशा ठेवणार्या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशा प्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असे .
2 Peter 1:10 in Marathi 10 म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचे पतन कधीही होणार नाही.
1 John 2:25 in Marathi 25 आणि देवाने आम्हाला जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.
Revelation 13:10 in Marathi 10 जो कैदेत जायचा तो कैदेत जाताे; जो तलवारीने जीवे मारील त्याला तलवारीने मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो. भुमीतून वर आलेले श्वापद
Revelation 14:12 in Marathi 12 जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे.