Galatians 4:6 in Marathi 6 आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने‘अब्बा बापा,’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे; ‘
Other Translations King James Version (KJV) And because ye are sons, God hath sent forth the Spirit of his Son into your hearts, crying, Abba, Father.
American Standard Version (ASV) And because ye are sons, God sent forth the Spirit of his Son into our hearts, crying, Abba, Father.
Bible in Basic English (BBE) And because you are sons, God has sent out the Spirit of his Son into our hearts, saying, Abba, Father.
Darby English Bible (DBY) But because ye are sons, God has sent out the Spirit of his Son into our hearts, crying, Abba, Father.
World English Bible (WEB) And because you are children, God sent out the Spirit of his Son into your hearts, crying, "Abba,{Abba is a Greek spelling for the Chaldee word for "Father" or "Daddy" used in a familiar, respectful, and loving way.} Father!"
Young's Literal Translation (YLT) and because ye are sons, God did send forth the spirit of His Son into your hearts, crying, `Abba, Father!'
Cross Reference Matthew 6:6 in Marathi 6 पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हाला प्रतिफळ देईल.
Luke 11:2 in Marathi 2 मग तो त्यांना म्हणाला, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा:हे आमच्या स्वर्गातील ‘बापा, तुझे नांव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो,
Luke 11:13 in Marathi 13 जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देेण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
John 3:34 in Marathi 34 कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
John 7:39 in Marathi 39 ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
John 14:16 in Marathi 16 मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ राहावे.
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:7 in Marathi 7 तरीपण मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन;
Acts 16:7 in Marathi 7 आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला ;परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही;
Romans 5:5 in Marathi 5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात, आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाची प्रीती ओतली जात आहे.
Romans 8:9 in Marathi 9 पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहा. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही.
Romans 8:15 in Marathi 15 कारण तुम्हाला, पुन्हा भय धरण्यास, दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे, ‘अब्बा, बापा,’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे.
Romans 8:26 in Marathi 26 त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो.
1 Corinthians 15:45 in Marathi 45 आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत जीव झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला.
2 Corinthians 1:22 in Marathi 22 तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे, आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला आहे.
2 Corinthians 3:17 in Marathi 17 आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे.
Ephesians 1:13 in Marathi 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुध्दा सत्याचे वचन आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
Ephesians 2:18 in Marathi 18 “ कारण येशूच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्यात पित्याजवळ प्रवेश होतो.
Ephesians 4:30 in Marathi 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.
Ephesians 6:18 in Marathi 18 प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
Philippians 1:19 in Marathi 19 कारण मी जाणताे की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उध्दारास कारण होईल.
Hebrews 4:14 in Marathi 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान प्रमुख याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
1 Peter 1:11 in Marathi 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”