Acts 2:38 in Marathi 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या;म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
Other Translations King James Version (KJV) Then Peter said unto them, Repent, and be baptized every one of you in the name of Jesus Christ for the remission of sins, and ye shall receive the gift of the Holy Ghost.
American Standard Version (ASV) And Peter `said' unto them, Repent ye, and be baptized every one of you in the name of Jesus Christ unto the remission of your sins; and ye shall receive the gift of the Holy Spirit.
Bible in Basic English (BBE) And Peter said, Let your hearts be changed, every one of you, and have baptism in the name of Jesus Christ, for the forgiveness of your sins; and you will have the Holy Spirit given to you.
Darby English Bible (DBY) And Peter said to them, Repent, and be baptised, each one of you, in the name of Jesus Christ, for remission of sins, and ye will receive the gift of the Holy Spirit.
World English Bible (WEB) Peter said to them, "Repent, and be baptized, everyone of you, in the name of Jesus Christ for the forgiveness of sins, and you will receive the gift of the Holy Spirit.
Young's Literal Translation (YLT) and Peter said unto them, `Reform, and be baptized each of you on the name of Jesus Christ, to remission of sins, and ye shall receive the gift of the Holy Spirit,
Cross Reference Matthew 3:2 in Marathi 2 पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
Matthew 3:8 in Marathi 8 हयास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या;
Matthew 4:17 in Marathi 17 त्यावेळेपासून येशू घोषणा करू लागला व म्हणू लागला की, “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
Matthew 21:28 in Marathi 28 “याविषयी तुम्हाला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
Matthew 28:19 in Marathi 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
Mark 1:15 in Marathi 15 आणि तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.
Mark 16:16 in Marathi 16 जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
Luke 15:1 in Marathi 1 सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते.
Luke 24:47 in Marathi 47 आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा गाजविण्यात यावी.
Acts 2:16 in Marathi 16 परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे.
Acts 3:19 in Marathi 19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत,
Acts 5:31 in Marathi 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
Acts 8:12 in Marathi 12 परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिप्पाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याचवेळी लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरूष होते. तशा स्त्रियाही होत्या.
Acts 8:15 in Marathi 15 पेत्र व योहान जेव्हा आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली.
Acts 8:20 in Marathi 20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास!
Acts 8:36 in Marathi 36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ)आले. अधिकारी म्हणाला, “पाहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.त्याने उत्तर दिले,येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.
Acts 10:44 in Marathi 44 पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला.
Acts 10:48 in Marathi 48 म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशु ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंती केली.
Acts 16:15 in Marathi 15 मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हाला मान्य करावी लागली.
Acts 16:31 in Marathi 31 ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.
Acts 17:30 in Marathi 30 अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.
Acts 19:4 in Marathi 4 पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”
Acts 20:21 in Marathi 21 पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.
Acts 22:16 in Marathi 16 तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर .
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Acts 26:20 in Marathi 20 उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेमातील, यहूदा प्रांतातील सर्व आणि यहूदीतर विदेशी लोकांनासुध्दा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.
Romans 6:3 in Marathi 3 किंवा, आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूत बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय?
1 Corinthians 1:13 in Marathi 13 ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का?
Titus 3:5 in Marathi 5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीकरणाने तारले.
1 Peter 3:21 in Marathi 21 आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा (देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो.