1 Corinthians 14:6 in Marathi 6 आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?
Other Translations King James Version (KJV) Now, brethren, if I come unto you speaking with tongues, what shall I profit you, except I shall speak to you either by revelation, or by knowledge, or by prophesying, or by doctrine?
American Standard Version (ASV) But now, brethren, if I come unto you speaking with tongues, what shall I profit you, unless I speak to you either by way of revelation, or of knowledge, or of prophesying, or of teaching?
Bible in Basic English (BBE) But, now, my brothers, if I come to you using tongues, what profit will it be to you, if I do not give you a revelation, or knowledge, or the word of the prophet, or teaching?
Darby English Bible (DBY) And now, brethren, if I come to you speaking with tongues, what shall I profit you, unless I shall speak to you either in revelation, or in knowledge, or in prophecy, or in teaching?
World English Bible (WEB) But now, brothers,{The word for "brothers" here and where context allows may also be correctly translated "brothers and sisters" or "siblings."} if I come to you speaking with other languages, what would I profit you, unless I speak to you either by way of revelation, or of knowledge, or of prophesying, or of teaching?
Young's Literal Translation (YLT) And now, brethren, if I may come unto you speaking tongues, what shall I profit you, except I shall speak to you either in revelation, or in knowledge, or in prophesying, or in teaching?
Cross Reference Matthew 11:25 in Marathi 25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुध्दीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या.
Matthew 16:17 in Marathi 17 येशू म्हणाला, “शिमोन, बार्येाना, तू आशीर्वादित आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
Matthew 16:26 in Marathi 26 जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?
Acts 2:42 in Marathi 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
Romans 6:17 in Marathi 17 पण देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला, त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्यात,
Romans 15:14 in Marathi 14 आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहा.
Romans 16:17 in Marathi 17 आता, बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.
1 Corinthians 10:33 in Marathi 33 जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
1 Corinthians 12:7 in Marathi 7 पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे.
1 Corinthians 13:2 in Marathi 2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि, मला डोंगर ढळवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
1 Corinthians 13:8 in Marathi 8 प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;
1 Corinthians 14:1 in Marathi 1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. आणि आध्यात्मिक दानांची विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
1 Corinthians 14:26 in Marathi 26 बंधूंनो मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकजण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास,कोणी प्रकटीकरण सांगण्यास,कोणी अन्य भाषेतून बोलण्यास, तर कोणी अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही मंडळीच्या उन्नतीसाठी असावे.
2 Corinthians 11:6 in Marathi 6 आणि मी भाषण करण्यात अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही. आम्ही हे तुम्हाला सर्व गोष्टींत, सर्व प्रकारे, प्रकट केले.
2 Corinthians 12:1 in Marathi 1 मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही, पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो .
2 Corinthians 12:7 in Marathi 7 आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे, मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये, म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 3:4 in Marathi 4 जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या सत्य रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हाला समजता येईल,
Philippians 3:15 in Marathi 15 तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृति ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृति ठेवली, तरी देव तेही तुम्हाला प्रकट करील.
2 Timothy 2:14 in Marathi 14 लोकांना या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुध्द करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.
2 Timothy 3:10 in Marathi 10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे,ही ओळखून आहेस,
2 Timothy 3:16 in Marathi 16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
2 Timothy 4:2 in Marathi 2 वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
Titus 3:8 in Marathi 8 हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू ह्या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. ह्या गोष्टी चांगल्या असून माणसासाठी हितकारक आहेत.
Hebrews 13:9 in Marathi 9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरणे बळकट केलेली फार बरी. कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
2 Peter 1:5 in Marathi 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.
2 John 1:9 in Marathi 9 ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहतां जो पुढेंपुढेंच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ति झाली आहे.