1 Corinthians 14:2 in Marathi 2 ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता माणसांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. आत्म्याच्या द्वारे तो गुढ गोष्टी बोलतो.
Other Translations King James Version (KJV) For he that speaketh in an unknown tongue speaketh not unto men, but unto God: for no man understandeth him; howbeit in the spirit he speaketh mysteries.
American Standard Version (ASV) For he that speaketh in a tongue speaketh not unto men, but unto God; for no man understandeth; but in the spirit he speaketh mysteries.
Bible in Basic English (BBE) For he who makes use of tongues is not talking to men but to God; because no one has the sense of what he is saying; but in the Spirit he is talking of secret things.
Darby English Bible (DBY) For he that speaks with a tongue does not speak to men but to God: for no one hears; but in spirit he speaks mysteries.
World English Bible (WEB) For he who speaks in another language speaks not to men, but to God; for no one understands; but in the Spirit he speaks mysteries.
Young's Literal Translation (YLT) for he who is speaking in an `unknown' tongue -- to men he doth not speak, but to God, for no one doth hearken, and in spirit he doth speak secrets;
Cross Reference Matthew 13:11 in Marathi 11 त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
Mark 4:11 in Marathi 11 तो त्यांना म्हणाला, '' देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हाला दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते.
Mark 16:17 in Marathi 17 परंतु जो विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भुते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.’
Acts 2:4 in Marathi 4 तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले.
Acts 10:46 in Marathi 46 आणि यहूदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहूदी लोकांनी एेकले.
Acts 19:6 in Marathi 6 आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.
Acts 22:9 in Marathi 9 तेव्हा माझ्या बरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा , परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही .
1 Corinthians 2:7 in Marathi 7 तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते.
1 Corinthians 2:10 in Marathi 10 ते देवाने आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे. कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो.
1 Corinthians 13:2 in Marathi 2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि, मला डोंगर ढळवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
1 Corinthians 14:9 in Marathi 9 त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल.
1 Corinthians 14:16 in Marathi 16 कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही.
1 Corinthians 14:18 in Marathi 18 मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो.
1 Corinthians 14:27 in Marathi 27 जर कोणी अन्य भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एका वेळी एकानेच बोलावे, आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा.
1 Corinthians 15:51 in Marathi 51 पाहा! मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.
Ephesians 3:3 in Marathi 3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे मला सत्याचे रहस्य कळवले गेले मी ते यापुर्वी थोडक्यात लिहिले होते.
Ephesians 6:19 in Marathi 19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करा,जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
Colossians 1:26 in Marathi 26 जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता, त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे.
Colossians 2:2 in Marathi 2 ते परिश्रम ह्यांसाठी की,त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुध्दीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी;व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
1 Timothy 3:9 in Marathi 9 देवाने जे आम्हाला प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी शुध्द विवेकाने धरून ठेवावे.
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
Revelation 10:7 in Marathi 7 परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत तुतारी वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांस सुवार्ता सांगितली, त्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल.