Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Other Translations King James Version (KJV) Who gave himself for us, that he might redeem us from all iniquity, and purify unto himself a peculiar people, zealous of good works.
American Standard Version (ASV) who gave himself for us, that he might redeem us from all iniquity, and purify unto himself a people for his own possession, zealous of good works.
Bible in Basic English (BBE) Who gave himself for us, so that he might make us free from all wrongdoing, and make for himself a people clean in heart and on fire with good works.
Darby English Bible (DBY) who gave himself for us, that he might redeem us from all lawlessness, and purify to himself a peculiar people, zealous for good works.
World English Bible (WEB) who gave himself for us, that he might redeem us from all iniquity, and purify for himself a people for his own possession, zealous for good works.
Young's Literal Translation (YLT) who did give himself for us, that he might ransom us from all lawlessness, and might purify to himself a peculiar people, zealous of good works;
Cross Reference Matthew 1:21 in Marathi 21 ती पुत्राला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेव,अाणि तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील ,”
Matthew 3:12 in Marathi 12 त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.
Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
John 6:51 in Marathi 51 स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.
Acts 9:36 in Marathi 36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
Acts 15:9 in Marathi 9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुध्द करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
Acts 15:14 in Marathi 14 परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली , हे शिमोनाने सांगितले आहे;आणि हयाच्याशी संदेष्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की,
Romans 11:26 in Marathi 26 आणि सर्व इस्राएल अशा प्रकारे तारले जाईल. कारण असे लिहिले आहे की, ‘सियोनापासून उद्धारक येईल, आणि याकोबातून अभक्ती घालवील.
Romans 14:7 in Marathi 7 कारण, आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.
2 Corinthians 5:14 in Marathi 14 कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरते. कारण आम्ही असे मानतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले,
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.
Galatians 3:13 in Marathi 13 आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला.आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’,असा शास्त्रलेख आहे.
Ephesians 2:10 in Marathi 10 कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अारभीच याेजून ठेवले होते. यासाठी त्याप्रमाणे आम्ही चालावे.
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
Ephesians 5:23 in Marathi 23 कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. आणि ख्रिस्त विश्वासणाऱ्या शरीराचा तारणारा आहे.
1 Timothy 1:15 in Marathi 15 ``ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की , ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयला जगात आला, आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.
1 Timothy 2:6 in Marathi 6 त्याने सर्व लोकांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्य वेळी देणे आहे.
1 Timothy 2:10 in Marathi 10 तर देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
1 Timothy 6:18 in Marathi 18 चांगले ते करावे , चांगल्या कृत्यात धनवान ,उदार व परोपकारी असावे.
Titus 2:7 in Marathi 7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
Titus 3:8 in Marathi 8 हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू ह्या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. ह्या गोष्टी चांगल्या असून माणसासाठी हितकारक आहेत.
Hebrews 9:14 in Marathi 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सार्वकालिक आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे निष्कलंक आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धी शुध्द करील. अशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
Hebrews 10:24 in Marathi 24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
James 4:8 in Marathi 8 तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुध्द करा; अहो व्दिबुध्दीच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुध्द करा.
1 Peter 1:18 in Marathi 18 कारण तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.
1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
1 Peter 2:12 in Marathi 12 आणि, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 John 3:2 in Marathi 2 प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे अाम्हाला माहीत नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 5:9 in Marathi 9 आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्ट्रांतून विकत घेतले.