Titus 2:12 in Marathi 12 ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण ह्या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहीजे;.
Other Translations King James Version (KJV) Teaching us that, denying ungodliness and worldly lusts, we should live soberly, righteously, and godly, in this present world;
American Standard Version (ASV) instructing us, to the intent that, denying ungodliness and worldly lusts, we should live soberly and righteously and godly in this present world;
Bible in Basic English (BBE) Training us so that, turning away from evil and the desires of this world, we may be living wisely and uprightly in the knowledge of God in this present life;
Darby English Bible (DBY) teaching us that, having denied impiety and worldly lusts, we should live soberly, and justly, and piously in the present course of things,
World English Bible (WEB) instructing us to the intent that, denying ungodliness and worldly lusts, we would live soberly, righteously, and godly in this present world;
Young's Literal Translation (YLT) teaching us, that denying the impiety and the worldly desires, soberly and righteously and piously we may live in the present age,
Cross Reference Matthew 3:8 in Marathi 8 हयास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या;
Matthew 5:19 in Marathi 19 ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.
Matthew 16:24 in Marathi 24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Matthew 28:20 in Marathi 20 आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना पाळायला शिकवा. आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”
Luke 1:6 in Marathi 6 ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत
Luke 1:75 in Marathi 75 माझ्यासमोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.
Luke 3:9 in Marathi 9 आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.
John 6:25 in Marathi 25 आणि तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्याला म्हणाले, “गुरूजी, आपण इकडे कधी आलात?”
John 14:30 in Marathi 30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
John 17:14 in Marathi 14 मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.
Acts 24:16 in Marathi 16 ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुध्द राखण्याचा मी यत्न करत असतो.
Acts 24:25 in Marathi 25 तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
Romans 6:4 in Marathi 4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की, जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मेलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे.
Romans 6:12 in Marathi 12 म्हणून, तुम्ही आपल्या मर्त्य शरिरात, त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका.
Romans 6:19 in Marathi 19 मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो. कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.
Romans 8:13 in Marathi 13 कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.
Romans 12:2 in Marathi 2 आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची, उत्तम व त्याला संतोष देणारी, परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
Romans 13:12 in Marathi 12 रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या.
1 Corinthians 6:9 in Marathi 9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,
2 Corinthians 1:12 in Marathi 12 आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण,म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुध्दीची साक्ष होय.आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
2 Corinthians 7:1 in Marathi 1 प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुध्देपासून स्वतःला शुध्द करू, आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
Galatians 5:24 in Marathi 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.
Ephesians 1:4 in Marathi 4 देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.
Ephesians 2:2 in Marathi 2 “ज्यामध्ये तुम्ही पूर्वी या जगाच्या चालिरीतीप्रमाणे चालत व रहात होता, आकाशातील राज्याचा अधिकारी जो सैतान, आज्ञा मोडणाऱ्या पुत्रांच्या आत्म्यात कार्य करणाऱ्या अधिपती प्रमाणे चालत होता. . “
Ephesians 4:22 in Marathi 22 तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,
Colossians 1:22 in Marathi 22 त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हाला त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे.
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
1 Thessalonians 4:7 in Marathi 7 कारण देवाने आपल्याला अशुध्दपणासाठी नव्हे तर तुम्हास पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.
1 Thessalonians 4:9 in Marathi 9 बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे ह्याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी,असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे;
1 Timothy 4:12 in Marathi 12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .
1 Timothy 6:17 in Marathi 17 या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.
2 Timothy 3:12 in Marathi 12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुध्द जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
2 Timothy 4:10 in Marathi 10 कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. व तीत दालमतीयास गेला आहे.
Titus 3:3 in Marathi 3 कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो;
Hebrews 8:11 in Marathi 11 तुमच्या परमेश्वराला ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
James 4:8 in Marathi 8 तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुध्द करा; अहो व्दिबुध्दीच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुध्द करा.
1 Peter 1:14 in Marathi 14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
1 Peter 2:11 in Marathi 11 माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्या दैहिक वासनांपासून दूर रहा.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
2 Peter 1:4 in Marathi 4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत;ह्यासाठी की,त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे भागीदार व्हावे.
2 Peter 2:9 in Marathi 9 तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.
2 Peter 2:20 in Marathi 20 कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.
2 Peter 3:11 in Marathi 11 ह्या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?
1 John 2:6 in Marathi 6 मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशूख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
1 John 2:15 in Marathi 15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.
1 John 2:27 in Marathi 27 पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक -तो सत्य आहे, खोटा नाही - तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
Jude 1:18 in Marathi 18 त्यांनी तुम्हाला म्हटले होते की, ‘शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील’.
Revelation 14:12 in Marathi 12 जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे.