Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
Other Translations King James Version (KJV) For whom he did foreknow, he also did predestinate to be conformed to the image of his Son, that he might be the firstborn among many brethren.
American Standard Version (ASV) For whom he foreknew, he also foreordained `to be' conformed to the image of his Son, that he might be the firstborn among many brethren:
Bible in Basic English (BBE) Because those of whom he had knowledge before they came into existence, were marked out by him to be made like his Son, so that he might be the first among a band of brothers:
Darby English Bible (DBY) Because whom he has foreknown, he has also predestinated [to be] conformed to the image of his Son, so that he should be [the] firstborn among many brethren.
World English Bible (WEB) For whom he foreknew, he also predestined to be conformed to the image of his Son, that he might be the firstborn among many brothers.{The word for "brothers" here and where context allows may also be correctly translated "brothers and sisters" or "siblings."}
Young's Literal Translation (YLT) because whom He did foreknow, He also did fore-appoint, conformed to the image of His Son, that he might be first-born among many brethren;
Cross Reference Matthew 7:23 in Marathi 23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हाला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
Matthew 12:50 in Marathi 50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”
Matthew 25:40 in Marathi 40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
John 17:16 in Marathi 16 जसा मी जगाचा नाही, तसे तेहि जगाचे नाहींत.
John 17:19 in Marathi 19 आणि त्यांनीहि सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरितां स्वतःला पवित्र करतो.
John 17:22 in Marathi 22 तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे ;
John 17:26 in Marathi 26 मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यांमध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
John 20:17 in Marathi 17 येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.’”
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
Romans 11:2 in Marathi 2 देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने सोडले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,
Romans 13:14 in Marathi 14 तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.
1 Corinthians 2:7 in Marathi 7 तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते.
1 Corinthians 15:49 in Marathi 49 आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू.
2 Corinthians 3:18 in Marathi 18 पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्व जण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
Ephesians 1:4 in Marathi 4 देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.
Ephesians 1:11 in Marathi 11 ख्रिस्तामध्ये आम्ही पूर्वीच देवाचे लोक म्हणून त्याच्या योजनेप्रमाणे निवडून नेमले गेलो. जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो
Ephesians 4:24 in Marathi 24 आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे.तो धारण करावा.
Philippians 3:21 in Marathi 21 तो ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचें नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरिरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.
Colossians 1:15 in Marathi 15 तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
2 Timothy 2:19 in Marathi 19 तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्याला हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे .”
Hebrews 1:5 in Marathi 5 त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.” देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “मी त्याचा पिता होईन ? व तो माझा पुत्र होईल ?
Hebrews 2:11 in Marathi 11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही.
1 Peter 1:2 in Marathi 2 देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, आज्ञापालन करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
1 John 3:2 in Marathi 2 प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे अाम्हाला माहीत नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.