Revelation 2:9 in Marathi 9 “मला तुमचे दु:ख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गाेष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, (पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.)
Other Translations King James Version (KJV) I know thy works, and tribulation, and poverty, (but thou art rich) and I know the blasphemy of them which say they are Jews, and are not, but are the synagogue of Satan.
American Standard Version (ASV) I know thy tribulation, and thy poverty (but thou art rich), and the blasphemy of them that say they are Jews, and they art not, but are a synagogue of Satan.
Bible in Basic English (BBE) I have knowledge of your troubles and how poor you are (but you have true wealth), and the evil words of those who say they are Jews, and are not, but are a Synagogue of Satan.
Darby English Bible (DBY) I know thy tribulation and thy poverty; but thou art rich; and the railing of those who say that they themselves are Jews, and are not, but a synagogue of Satan.
World English Bible (WEB) "I know your works, oppression, and your poverty (but you are rich), and the blasphemy of those who say they are Jews, and they are not, but are a synagogue of Satan.
Young's Literal Translation (YLT) I have known thy works, and tribulation, and poverty -- yet thou art rich -- and the evil-speaking of those saying themselves to be Jews, and are not, but `are' a synagogue of the Adversary.
Cross Reference Matthew 4:10 in Marathi 10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की, '‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर 'आणि केवळ त्याचीच सेवा कर.’”
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
Luke 6:20 in Marathi 20 मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला,'अहो दीनांनो तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
Luke 12:21 in Marathi 21 “जो कोणी स्वतः:साठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”
Luke 22:65 in Marathi 65 आणि ते त्याचा अपमान करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.
John 16:33 in Marathi 33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”
Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Acts 26:11 in Marathi 11 अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली. आणि देवाविरुध्द जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.
Romans 2:17 in Marathi 17 आता जर, तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस, आणि देवाचा अभिमान मिरवतोस;
Romans 2:28 in Marathi 28 कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही; किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.
Romans 5:3 in Marathi 3 आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते,
Romans 8:35 in Marathi 35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?
Romans 9:6 in Marathi 6 पण देवाचे वचन, जणू, व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,
Romans 12:12 in Marathi 12 आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
2 Corinthians 6:10 in Marathi 10 आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले, आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
2 Corinthians 8:2 in Marathi 2 ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची आैदार्यसंपदा विपुल झाली.
2 Corinthians 8:9 in Marathi 9 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
1 Thessalonians 3:4 in Marathi 4 कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हाला सांंगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेहि, हे तुम्हाला माहीतच आहे.
2 Thessalonians 1:6 in Marathi 6 तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,
1 Timothy 1:13 in Marathi 13 जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो, पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.
1 Timothy 6:18 in Marathi 18 चांगले ते करावे , चांगल्या कृत्यात धनवान ,उदार व परोपकारी असावे.
James 2:5 in Marathi 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
Revelation 2:2 in Marathi 2 “तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम,कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
Revelation 3:9 in Marathi 9 पाहा! जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.
Revelation 3:17 in Marathi 17 तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कशाची गरज नाही. पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.
Revelation 7:14 in Marathi 14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.