Philippians 4:1 in Marathi 1 म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुगूट आहा; म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
Other Translations King James Version (KJV) Therefore, my brethren dearly beloved and longed for, my joy and crown, so stand fast in the Lord, my dearly beloved.
American Standard Version (ASV) Wherefore, my brethren beloved and longed for, my joy and crown, so stand fast in the Lord, my beloved.
Bible in Basic English (BBE) So my brothers, well loved and very dear to me, my joy and crown, be strong in the Lord, my loved ones.
Darby English Bible (DBY) So that, my brethren, beloved and longed for, my joy and crown, thus stand fast in [the] Lord, beloved.
World English Bible (WEB) Therefore, my brothers, beloved and longed for, my joy and crown, so stand firm in the Lord, my beloved.
Young's Literal Translation (YLT) So then, my brethren, beloved and longed for, my joy and crown, so stand ye in the Lord, beloved.
Cross Reference Matthew 10:22 in Marathi 22 माझ्या नावामुळे सर्व तुमचा व्देष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल.
John 8:31 in Marathi 31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
John 15:3 in Marathi 3 जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुध्द झालांच आहा.
Acts 2:42 in Marathi 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
Acts 11:23 in Marathi 23 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.”
Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
1 Corinthians 15:58 in Marathi 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
1 Corinthians 16:13 in Marathi 13 सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा.
2 Corinthians 1:14 in Marathi 14 त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की,जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
Galatians 5:1 in Marathi 1 ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यात तुम्ही टिकून राहा, आणि दासत्वाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.
Ephesians 6:10 in Marathi 10 शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
Philippians 1:8 in Marathi 8 देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे,
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Philippians 2:16 in Marathi 16 त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमहि व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
Philippians 2:26 in Marathi 26 कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्याला समजल्यावर त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;
Philippians 3:20 in Marathi 20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहात आहो.
Colossians 4:12 in Marathi 12 ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्यें सर्वदा तुम्हांसाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे.
1 Thessalonians 2:19 in Marathi 19 कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत,त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुगूट काय आहे? तुम्हीच आहा ना? .
1 Thessalonians 3:8 in Marathi 8 कारण जर तुम्ही प्रभूमध्ये खंबीरपणे टिकता तर आता आम्ही जिवांत जीव आल्यासारखे राहतो.
1 Thessalonians 3:13 in Marathi 13 ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दाेष होण्यासाठी स्थिर करावी.
2 Thessalonians 2:15 in Marathi 15 तर मग बंधूनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा.
2 Timothy 2:1 in Marathi 1 माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.
Hebrews 3:14 in Marathi 14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
Hebrews 4:14 in Marathi 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान प्रमुख याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
Hebrews 10:23 in Marathi 23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
Hebrews 10:35 in Marathi 35 म्हणून धैर्य सोडू नका,त्याचे प्रतिफळ माेठे आहे.
2 Peter 3:11 in Marathi 11 ह्या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?
2 Peter 3:17 in Marathi 17 तर प्रियजनहो, तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सांपडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये हयासाठी जपून राहा.
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे
Revelation 3:10 in Marathi 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हाला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.