Philippians 3:9 in Marathi 9 आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाव्दारे, म्हणजे देवाकडून विश्वासाव्दारे मिळणारे नीतिमत्व असे असावे.
Other Translations King James Version (KJV) And be found in him, not having mine own righteousness, which is of the law, but that which is through the faith of Christ, the righteousness which is of God by faith:
American Standard Version (ASV) and be found in him, not having a righteousness of mine own, `even' that which is of the law, but that which is through faith in Christ, the righteousness which is from God by faith:
Bible in Basic English (BBE) And be seen in him, not having my righteousness which is of the law, but that which is through faith in Christ, the righteousness which is of God by faith:
Darby English Bible (DBY) and that I may be found in him, not having my righteousness, which [would be] on the principle of law, but that which is by faith of Christ, the righteousness which [is] of God through faith,
World English Bible (WEB) and be found in him, not having a righteousness of my own, that which is of the law, but that which is through faith in Christ, the righteousness which is from God by faith;
Young's Literal Translation (YLT) not having my righteousness, which `is' of law, but that which `is' through faith of Christ -- the righteousness that is of God by the faith,
Cross Reference Matthew 9:13 in Marathi 13 मी तुम्हाला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.”
Luke 10:25 in Marathi 25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?
John 16:8 in Marathi 8 आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खातरी करील.
Romans 1:17 in Marathi 17 कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते. कारण असा शास्त्रलेख आहे की, नीतिमान विश्वासाने जगेल’.
Romans 3:19 in Marathi 19 आता आपण हे जाणतो की, नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते; म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
Romans 4:5 in Marathi 5 पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो,त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणला जातो,
Romans 4:13 in Marathi 13 कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्वाच्या द्वारे होते.
Romans 5:21 in Marathi 21 म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे प्राप्त होणार्या सार्वकालिक जीवनासाठी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे राज्य चालवावे.
Romans 7:5 in Marathi 5 कारण आपण देहाधीन असतेवेळी, नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.
Romans 8:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्त येशुमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही.ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Romans 9:30 in Marathi 30 मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्व मिळविले आहे.
Romans 10:1 in Marathi 1 बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरता देवाजवळ विनंती आहे.
Romans 10:10 in Marathi 10 कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
Romans 16:7 in Marathi 7 माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते.
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
2 Corinthians 5:17 in Marathi 17 म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
Galatians 2:16 in Marathi 16 तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो,हे जाणून आम्ही ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला;ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्ही ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
Galatians 3:10 in Marathi 10 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाधीन आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे’.
Galatians 3:21 in Marathi 21 तर मग नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुध्द आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.
Philippians 3:6 in Marathi 6 आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; आणि नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
Titus 3:5 in Marathi 5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीकरणाने तारले.
Hebrews 6:18 in Marathi 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
James 2:9 in Marathi 9 पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता, आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.
James 3:2 in Marathi 2 कारण, पुष्कळ गोष्टींत आपण सर्व जण चुकतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.
1 Peter 3:19 in Marathi 19 आणि तो त्याद्वारे गेला व त्याने अटकेतल्या आत्म्याना घोषणा केली.
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
1 John 1:8 in Marathi 8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही.
1 John 3:4 in Marathi 4 प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो. कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे.