Philippians 3:8 in Marathi 8 इतकेच नाही,तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली. आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
Other Translations King James Version (KJV) Yea doubtless, and I count all things but loss for the excellency of the knowledge of Christ Jesus my Lord: for whom I have suffered the loss of all things, and do count them but dung, that I may win Christ,
American Standard Version (ASV) Yea verily, and I count all things to be loss for the excellency of the knowledge of Christ Jesus my Lord: for whom I suffered the loss of all things, and do count them but refuse, that I may gain Christ,
Bible in Basic English (BBE) Yes truly, and I am ready to give up all things for the knowledge of Christ Jesus my Lord, which is more than all: for whom I have undergone the loss of all things, and to me they are less than nothing, so that I may have Christ as my reward,
Darby English Bible (DBY) But surely I count also all things to be loss on account of the excellency of the knowledge of Christ Jesus my Lord, on account of whom I have suffered the loss of all, and count them to be filth, that I may gain Christ;
World English Bible (WEB) Yes most assuredly, and I count all things to be loss for the excellency of the knowledge of Christ Jesus, my Lord, for whom I suffered the loss of all things, and count them nothing but refuse, that I may gain Christ
Young's Literal Translation (YLT) yes, indeed, and I count all things to be loss, because of the excellency of the knowledge of Christ Jesus my Lord, because of whom of the all things I suffered loss, and do count them to be refuse, that Christ I may gain, and be found in him,
Cross Reference Matthew 11:25 in Marathi 25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुध्दीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या.
Matthew 13:44 in Marathi 44 स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे , ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले.
Matthew 16:16 in Marathi 16 शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
Matthew 19:27 in Marathi 27 पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत; मग आम्हाला काय मिळेल.?”
Luke 1:43 in Marathi 43 माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला काेठून ?
Luke 10:21 in Marathi 21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुध्दीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
Luke 11:20 in Marathi 20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
Luke 20:42 in Marathi 42 कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो,“परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले.
John 14:7 in Marathi 7 मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाहि ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेहि आहे.”
John 14:20 in Marathi 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
John 16:3 in Marathi 3 त्यांनी पित्याला आणि मलाहि ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
John 17:8 in Marathi 8 कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर आेळखले, आणि तू मला पाठवले.असा त्यांनी विश्वास ठेवला.
John 20:13 in Marathi 13 आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “ त्यांनी माझ्या प्रभूला नेले, आणि त्याला कोठे ठेवले हे मला माहीत नाही.”
John 20:28 in Marathi 28 आणि थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!”
Acts 20:24 in Marathi 24 मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.
Romans 8:18 in Marathi 18 कारण मी मानतो की, ह्या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत.
1 Corinthians 2:2 in Marathi 2 कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे.
1 Corinthians 4:9 in Marathi 9 कारण मला वाटते की देवाने आम्हाला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जणु तमाशा असे झालो आहोत.
1 Corinthians 9:10 in Marathi 10 किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे. म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे, आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ ह्या आशेने करावी.
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
2 Corinthians 11:23 in Marathi 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) . मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 3:18 in Marathi 18 “ “यासाठी की,जे पवित्र जन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
Ephesians 4:13 in Marathi 13 आपण सगळे देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या ऐक्यात, प्रौढ मनुष्यपणात, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिमाणात पोहोचेपर्यंत दिले आहेत.
Philippians 3:7 in Marathi 7 तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.
Philippians 3:10 in Marathi 10 हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची,त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी आेळख करून घ्यावी.
Colossians 2:2 in Marathi 2 ते परिश्रम ह्यांसाठी की,त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुध्दीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी;व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
2 Timothy 4:6 in Marathi 6 कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे.
Hebrews 3:14 in Marathi 14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
1 Peter 2:7 in Marathi 7 म्हणून विश्वास ठेवणार्या तुम्हाला तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्याचा मुख्य कोनशिला झाला आहे’;
2 Peter 1:3 in Marathi 3 ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या आेळखीच्या द्वारे, त्याच्या आपल्याला, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.
1 John 1:3 in Marathi 3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
1 John 2:19 in Marathi 19 आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते;त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.