Philippians 1:20 in Marathi 20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराव्दारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
Other Translations King James Version (KJV) According to my earnest expectation and my hope, that in nothing I shall be ashamed, but that with all boldness, as always, so now also Christ shall be magnified in my body, whether it be by life, or by death.
American Standard Version (ASV) according to my earnest expectation and hope, that in nothing shall I be put to shame, but `that' with all boldness, as always, `so' now also Christ shall be magnified in my body, whether by life, or by death.
Bible in Basic English (BBE) In the measure of my strong hope and belief that in nothing will I be put to shame, but that without fear, as at all times, so now will Christ have glory in my body, by life or by death.
Darby English Bible (DBY) according to my earnest expectation and hope, that in nothing I shall be ashamed, but in all boldness, as always, now also Christ shall be magnified in my body whether by life or by death.
World English Bible (WEB) according to my earnest expectation and hope, that I will in no way be disappointed, but with all boldness, as always, now also Christ will be magnified in my body, whether by life, or by death.
Young's Literal Translation (YLT) according to my earnest expectation and hope, that in nothing I shall be ashamed, and in all freedom, as always, also now Christ shall be magnified in my body, whether through life or through death,
Cross Reference John 12:27 in Marathi 27 “आता माझा जीव अस्वस्थ होत आहे, आणि मी काय बोलू?हे बापा, तू ह्या घटकेपासून माझे रक्षण कर.पण मी ह्या कारणासाठीच या घटकेत आलो आहे.
John 21:19 in Marathi 19 तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला. आणि हे बोलल्यावर तो त्याला म्हणतो, “माझ्यामागे ये.”
Acts 20:24 in Marathi 24 मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.
Acts 21:13 in Marathi 13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”
Romans 5:5 in Marathi 5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात, आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाची प्रीती ओतली जात आहे.
Romans 6:13 in Marathi 13 आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मेलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.
Romans 6:19 in Marathi 19 मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो. कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.
Romans 8:19 in Marathi 19 कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
Romans 9:33 in Marathi 33 कारण असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Romans 14:7 in Marathi 7 कारण, आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.
1 Corinthians 6:20 in Marathi 20 कारण तुम्हाला मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
1 Corinthians 7:34 in Marathi 34 जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र व्हावे ; पण जी विवाहित आहे ती जगातल्या गोष्टींची, म्हणजे आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे ह्याची काळजी करते.
1 Corinthians 15:31 in Marathi 31 बंधूंनो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज रोज मरतो.
2 Corinthians 2:14 in Marathi 14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
2 Corinthians 4:10 in Marathi 10 आम्ही निरंतर आमच्या शरिरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरिरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.
2 Corinthians 5:15 in Marathi 15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
2 Corinthians 7:14 in Marathi 14 आणि तुमच्याविषयी त्याच्यापुढे मी जर अभिमान मिरवला असेल तर मला काही लाज वाटत नाही. पण आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याबरोबर सर्व काही खरेपणाने बोलतो, त्याचप्रमाणे तीतापुढील तुम्हाविषयीचा आमचा अभिमान खरेपणाचा आढळला आहे.
2 Corinthians 10:8 in Marathi 8 कारण, प्रभूने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही;
Ephesians 6:19 in Marathi 19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करा,जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
Philippians 1:14 in Marathi 14 आणि माझ्या बेड्यांमुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत.
Philippians 1:23 in Marathi 23 कारण मी दोहोसंबंधाने पेचांत आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;
Philippians 2:17 in Marathi 17 तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
1 Thessalonians 5:23 in Marathi 23 आणि स्वतः शांतीचा देव तुम्हाला पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
2 Timothy 4:6 in Marathi 6 कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे.
1 Peter 4:16 in Marathi 16 ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
2 Peter 1:12 in Marathi 12 ह्या कारणास्तव, जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहित आहेत, आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हाला त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन.
1 John 2:28 in Marathi 28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हाला धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.