Philippians 1 in Marathi

1 पौल व तिमथ्य, ख्रिस्त येशूचे दास यांच्याकडून; फिलिपै येथे ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जणांस, त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यांस सलाम;

2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती असो.

3 मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो.

4 माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; कारण, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची सुवार्तेच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो.

6 आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा भरवसा आहे.

7 आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हाला बाळगून आहे.

8 देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे,

9 मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,

10 यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.

11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या व्दारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे.

12 माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापसून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीधूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे.

13 म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिध्द झाले;

14 आणि माझ्या बेड्यांमुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत.

15 कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही सदिच्छेने करीत आहेत.

16 मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात.

17 पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात.

18 ह्यापासून काय झाले? निमीत्ताने असो, किंवा खरेपणाने, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करतो व करणारच.

19 कारण मी जाणताे की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उध्दारास कारण होईल.

20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराव्दारे ख्रिस्ताचा महिमा होईल.

21 कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.

22 पण जर मी देहांत जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही.

23 कारण मी दोहोसंबंधाने पेचांत आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;

24 तरीपण, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.

25 मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे.आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे.

26 हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे.

27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.

28 आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे.

29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे,तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हाला दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.

30 मी जे युध्द केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहा.