Matthew 5:22 in Marathi 22 मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, अरे वेडगळा, असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.
Other Translations King James Version (KJV) But I say unto you, That whosoever is angry with his brother without a cause shall be in danger of the judgment: and whosoever shall say to his brother, Raca, shall be in danger of the council: but whosoever shall say, Thou fool, shall be in danger of hell fire.
American Standard Version (ASV) but I say unto you, that every one who is angry with his brother shall be in danger of the judgment; and whosoever shall say to his brother, Raca, shall be in danger of the council; and whosoever shall say, Thou fool, shall be in danger of the hell of fire.
Bible in Basic English (BBE) But I say to you that everyone who is angry with his brother will be in danger of being judged; and he who says to his brother, Raca, will be in danger from the Sanhedrin; and whoever says, You foolish one, will be in danger of the hell of fire.
Darby English Bible (DBY) But *I* say unto you, that every one that is lightly angry with his brother shall be subject to the judgment; but whosoever shall say to his brother, Raca, shall be subject to [be called before] the sanhedrim; but whosoever shall say, Fool, shall be subject to the penalty of the hell of fire.
World English Bible (WEB) But I tell you, that everyone who is angry with his brother without a cause shall be in danger of the judgment; and whoever shall say to his brother, 'Raca{"Raca" is an Aramaic insult, related to the word for "empty" and conveying the idea of empty-headedness.}!' shall be in danger of the council; and whoever shall say, 'You fool!' shall be in danger of the fire of Gehenna{Gehenna is another name for Hell that brings to mind an image of a burning garbage dump with dead bodies in it.}.
Young's Literal Translation (YLT) but I -- I say to you, that every one who is angry at his brother without cause, shall be in danger of the judgment, and whoever may say to his brother, Empty fellow! shall be in danger of the sanhedrim, and whoever may say, Rebel! shall be in danger of the gehenna of the fire.
Cross Reference Matthew 3:17 in Marathi 17 आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.
Matthew 5:23 in Marathi 23 ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या मनात भावाच्या विरूध्द काही आहे अशी तुला आठवण झाली,
Matthew 5:28 in Marathi 28 मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशीं व्यभिचार केलाच आहे.
Matthew 5:34 in Marathi 34 मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘ते देवाचे राजासन आहे’;
Matthew 5:44 in Marathi 44 मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जो तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
Matthew 10:17 in Marathi 17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हाला फटके मारतील.
Matthew 10:28 in Marathi 28 “जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या.
Matthew 11:18 in Marathi 18 योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात ‘त्याला भूत लागले आहे.’
Matthew 12:24 in Marathi 24 परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.”
Matthew 17:5 in Marathi 5 तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
Matthew 18:8 in Marathi 8 “जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हाला पापात पाडीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. तुम्ही एखादा अवयव गमावला, परंतु अनंतकाळचे जीवन मिळविले तर त्यात तुमचे जास्त हित आहे. दोन हात व दोन पाय यांच्यासह कधीही न विझणाऱ्या अग्नीत (नरकात) तुम्ही टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे होईल.
Matthew 18:21 in Marathi 21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?”
Matthew 18:35 in Marathi 35 “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”
Matthew 23:15 in Marathi 15 “परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हाला तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता.
Matthew 23:33 in Marathi 33 “तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात!. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल?
Matthew 25:41 in Marathi 41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.
Matthew 26:59 in Marathi 59 येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरूध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले.
Mark 9:43 in Marathi 43 जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.
Mark 14:55 in Marathi 55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.
Mark 15:1 in Marathi 1 पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले.
Luke 12:5 in Marathi 5 तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ठार मारल्यांनतर तुम्हास नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा.
Luke 16:23 in Marathi 23 श्रीमंत माणूस अधोलाेकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले,
John 7:20 in Marathi 20 लोकांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”
John 8:48 in Marathi 48 यहूद्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?”
John 11:47 in Marathi 47 मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
John 15:25 in Marathi 25 तथापि ’त्यांनी विनाकारण माझा व्देष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.
Acts 3:20 in Marathi 20 आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
Acts 5:27 in Marathi 27 त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले,
Acts 7:37 in Marathi 37 तोच मोशे इस्त्राएल लोकांना म्हणाला, परमेश्वर तुमच्या बांधवामधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.
Acts 17:18 in Marathi 18 तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो ? दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो; कारण येशू व पुनरुत्थान हयाविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.
Romans 12:10 in Marathi 10 बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे,
1 Corinthians 6:6 in Marathi 6 पण एक भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे?
1 Corinthians 6:10 in Marathi 10 चोर, लोभी किंवा दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे, ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाहीत.
Ephesians 4:26 in Marathi 26 तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.
Ephesians 4:31 in Marathi 31 सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी.
1 Thessalonians 4:6 in Marathi 6 कोणी ह्या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास अाधीच सांगितले होते व बजावलेहि होते.
Titus 3:2 in Marathi 2 कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे, पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी. अशी त्यांना आठवण दे.
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 12:25 in Marathi 25 जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरवले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे?
James 2:20 in Marathi 20 परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय?
James 3:6 in Marathi 6 आणि जिभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टिक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे.
1 Peter 2:23 in Marathi 23 त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण जो नीतीने न्याय करतो त्याच्यावर त्याने स्वतःस सोपवले.
1 Peter 3:9 in Marathi 9 तर वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे.
1 John 2:9 in Marathi 9 मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा व्देष करतो तो अजून अंधारांतच आहे.
1 John 3:10 in Marathi 10 ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोहि नाही.
1 John 3:14 in Marathi 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो.
1 John 4:20 in Marathi 20 “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा व्देष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.
1 John 5:16 in Marathi 16 जर एखाद्याला त्याचा बंधूला पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्याला जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.
Jude 1:9 in Marathi 9 परंतु आद्यदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही तर त्या ऐवजी ‘प्रभू तुला धमकावो’, असे म्हणाला.
Revelation 20:14 in Marathi 14 आणि मृत्यु व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण.