Cross Reference Matthew 5:26 in Marathi 26 मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
Matthew 6:2 in Marathi 2 म्हणून जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हाला खचीत सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे.
Matthew 6:16 in Marathi 16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 8:10 in Marathi 10 हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचीत सांगतो,मला इस्त्राएलात एवढा विश्वास आढळला नाही.
Matthew 10:15 in Marathi 15 मी तुम्हाला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
Matthew 10:23 in Marathi 23 एका ठिकाणी जर तुम्हाला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हाला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्त्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
Matthew 10:42 in Marathi 42 मी तुम्हाला खरे सांगतो की, ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”
Matthew 11:11 in Marathi 11 “मी तुम्हाला खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
Matthew 13:17 in Marathi 17 मी तुम्हाला खचीत सांगतो की, तुम्ही जे पाहत आहा ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.
Matthew 16:28 in Marathi 28 मी तुम्हाला खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काही जण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही
Matthew 17:20 in Marathi 20 तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटल्यास तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”
Matthew 18:3 in Marathi 3 आणि म्हटले, “मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
Matthew 18:18 in Marathi 18 “मी तुम्हाला खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले.
Matthew 19:23 in Marathi 23 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, धनवान माणसाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल.
Matthew 19:28 in Marathi 28 येशू म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा सिंहासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.
Matthew 21:21 in Marathi 21 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, जर तुम्हाला विश्वास असेल, आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजीराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
Matthew 21:31 in Marathi 31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.
Matthew 23:36 in Marathi 36 मी तुम्हाला खरे सांगतो; ह्या सर्व गोष्टीची शिक्षा तुमच्या पिढीवर येईल.
Matthew 24:2 in Marathi 2 परतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हाला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही.”
Matthew 24:34 in Marathi 34 मी तुम्हाला खरे सांगतोः या सर्व गोष्टी पूर्ण होऊपर्यत ही पिढी नाहीशी होणार नाही.
Matthew 24:47 in Marathi 47 मी तुम्हाला खचीत सांगतोः मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या नोकराची नेमणूक करील.
Matthew 25:12 in Marathi 12 “पण त्यांने उत्तर देऊन म्हटले, ‘मी तुम्हाला खरे सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही!’
Matthew 25:40 in Marathi 40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
Matthew 25:45 in Marathi 45 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.’
Matthew 26:13 in Marathi 13 मी तुम्हाला खरे सांगतो, सर्व जगात, जेथे सुवार्ता गाजवली जाईल तेथे तेथे या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.”
Mark 3:28 in Marathi 28 मी तुम्हास खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
Mark 6:11 in Marathi 11 आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.”
Mark 8:12 in Marathi 12 आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचीत सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.”
Mark 9:1 in Marathi 1 येशू त्या लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की. ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
Mark 9:41 in Marathi 41 मी तुम्हाला खचीत सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हाला जो काेणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.
Mark 10:15 in Marathi 15 मी तुम्हास खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.”
Mark 10:29 in Marathi 29 येशू म्हणाला, “मी तुम्हाला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्या करता व सुवार्तेकरता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे
Mark 11:23 in Marathi 23 मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
Mark 12:43 in Marathi 43 येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे.
Mark 13:30 in Marathi 30 मी तुम्हाला खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.
Mark 14:9 in Marathi 9 मी तुम्हाला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
Mark 14:18 in Marathi 18 मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
Mark 14:25 in Marathi 25 मी तुम्हाला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”
Mark 14:30 in Marathi 30 मग येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
Luke 4:24 in Marathi 24 मी तुम्हाला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतः:च्या गावात स्वीकारला जात नाही.
Luke 11:51 in Marathi 51 होय, मी तुम्हास खरोखर सांगतो की, हाबेलाच्या रक्तापासून ते देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मारल्या गेलेल्या, जखऱ्या याच्या रक्तापर्यंत या पिढीला जबाबदार धरण्यात येईल.
Luke 12:37 in Marathi 37 मालक परत आल्यावर जे नौकर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हाला खरे सांगतो, तो स्वतः: त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.
Luke 13:35 in Marathi 35 पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.
Luke 16:17 in Marathi 17 नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे.
Luke 18:17 in Marathi 17 मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा स्वर्गात प्रवेश होऊ शकणार नाही.”
Luke 18:29 in Marathi 29 येशूने त्यांना म्हटले, ' मी तुम्हाला खचित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळ सोडली
Luke 21:32 in Marathi 32 मी तुम्हास खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
Luke 23:43 in Marathi 43 येशू त्याला म्हणाला, 'मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.'
John 1:51 in Marathi 51 आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही ह्यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना मनुष्याच्या पुत्रावर चढत उतरत असलेले पहाल.”
John 3:3 in Marathi 3 येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
John 3:5 in Marathi 5 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
John 3:11 in Marathi 11 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.
John 5:19 in Marathi 19 ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून कांहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 6:26 in Marathi 26 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण त्या भाकरीतून खाल्लेत आणि तृप्त झालात म्हणून माझा शोध करता.
John 6:32 in Marathi 32 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो.
John 6:47 in Marathi 47 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.
John 6:53 in Marathi 53 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही.
John 8:34 in Marathi 34 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.
John 8:51 in Marathi 51 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही होणार नाही.”
John 8:58 in Marathi 58 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”
John 10:1 in Marathi 1 “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यांत दारातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे
John 10:7 in Marathi 7 म्हणून येशू त्यांना पुन्हा ,म्हणाला मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.
John 12:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मेला तर तो पुष्कळ पीक देतो.
John 13:16 in Marathi 16 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, दास आपल्या धन्यापेक्षां मोठा नाही; आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा मोठा नाही.
John 13:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
John 13:38 in Marathi 38 येशूने त्याला उत्तर दिले,काय? “तू माझ्यासाठी तू आपला जीव देशील? मी तुला खचीत खचीत सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”
John 14:12 in Marathi 12 “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षां अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
John 16:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
John 16:23 in Marathi 23 आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल.
John 21:18 in Marathi 18 “मी तुला खचीत खचीत सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”
Hebrews 1:11 in Marathi 11 ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
1 Peter 1:25 in Marathi 25 परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.’ आणि तुम्हाला त्याच वचनाची सुवार्ता सांगण्यात आली आहे.
2 Peter 3:10 in Marathi 10 तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत निघून होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील.
Revelation 20:11 in Marathi 11 तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्याला बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाश ही पळून गेली, आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.