Matthew 5:16 in Marathi 16 तशाच प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्यासाठी प्रकाश असे झाले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
Other Translations King James Version (KJV) Let your light so shine before men, that they may see your good works, and glorify your Father which is in heaven.
American Standard Version (ASV) Even so let your light shine before men; that they may see your good works, and glorify your Father who is in heaven.
Bible in Basic English (BBE) Even so let your light be shining before men, so that they may see your good works and give glory to your Father in heaven.
Darby English Bible (DBY) Let your light thus shine before men, so that they may see your upright works, and glorify your Father who is in the heavens.
World English Bible (WEB) Even so, let your light shine before men; that they may see your good works, and glorify your Father who is in heaven.
Young's Literal Translation (YLT) so let your light shine before men, that they may see your good works, and may glorify your Father who `is' in the heavens.
Cross Reference Matthew 5:45 in Marathi 45 अशासाठी की , तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
Matthew 6:1 in Marathi 1 “लोकांनी आपली न्यायीपण पहावे म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर जपा तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
Matthew 6:9 in Marathi 9 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी. ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.
Matthew 6:16 in Marathi 16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 9:8 in Marathi 8 हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
Matthew 23:5 in Marathi 5 “ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात. कारण ते आपली स्मरण पत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात.
Matthew 23:9 in Marathi 9 आणि जगातील कोणालाही ‘पिता’ म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे.
Luke 11:2 in Marathi 2 मग तो त्यांना म्हणाला, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा:हे आमच्या स्वर्गातील ‘बापा, तुझे नांव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो,
John 15:8 in Marathi 8 तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
Acts 9:36 in Marathi 36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
Romans 13:11 in Marathi 11 आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.
1 Corinthians 14:25 in Marathi 25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात. आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे!”तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी
2 Corinthians 9:13 in Marathi 13 ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;
Galatians 1:24 in Marathi 24 तेव्हा त्यांनी माझ्यावरून देवाचे गौरव केले.
Ephesians 2:10 in Marathi 10 कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अारभीच याेजून ठेवले होते. यासाठी त्याप्रमाणे आम्ही चालावे.
Ephesians 5:8 in Marathi 8 कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.
Philippians 2:15 in Marathi 15 ह्यासाठी की,ह्या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे;
1 Thessalonians 2:12 in Marathi 12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
1 Thessalonians 5:6 in Marathi 6 हयावरुन आपण इतरांसारखी झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे .
1 Timothy 2:10 in Marathi 10 तर देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
1 Timothy 5:10 in Marathi 10 जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.
1 Timothy 5:25 in Marathi 25 त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुध्दा कायमची लपवता येत नाहीत.
1 Timothy 6:18 in Marathi 18 चांगले ते करावे , चांगल्या कृत्यात धनवान ,उदार व परोपकारी असावे.
Titus 2:7 in Marathi 7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Titus 3:4 in Marathi 4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
Titus 3:7 in Marathi 7 म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.
Titus 3:14 in Marathi 14 आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी ; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.
Hebrews 10:24 in Marathi 24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
1 Peter 2:12 in Marathi 12 आणि, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
1 Peter 3:1 in Marathi 1 आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. कारण ते तुमचे शुध्द, आदराचे आचरण पाहतील.
1 Peter 3:16 in Marathi 16 आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्यांना लाज वाटावी.
1 Peter 4:11 in Marathi 11 जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्याला गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.
1 Peter 4:14 in Marathi 14 ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहा .कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहीला आहे.
1 John 1:5 in Marathi 5 जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे आणि तोच तुम्हाला घोषित करीत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.