Matthew 3:7 in Marathi 7 परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो दुष्ट सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले?
Other Translations King James Version (KJV) But when he saw many of the Pharisees and Sadducees come to his baptism, he said unto them, O generation of vipers, who hath warned you to flee from the wrath to come?
American Standard Version (ASV) But when he saw many of the Pharisees and Sadducees coming to his baptism, he said unto them, Ye offspring of vipers, who warned you to flee from the wrath to come?
Bible in Basic English (BBE) But when he saw a number of the Pharisees and Sadducees coming to his baptism, he said to them, Offspring of snakes, at whose word are you going in flight from the wrath to come?
Darby English Bible (DBY) But seeing many of the Pharisees and Sadducees coming to his baptism, he said to them, Offspring of vipers, who has forewarned you to flee from the coming wrath?
World English Bible (WEB) But when he saw many of the Pharisees and Sadducees coming for his baptism, he said to them, "You offspring of vipers, who warned you to flee from the wrath to come?
Young's Literal Translation (YLT) And having seen many of the Pharisees and Sadducees coming about his baptism, he said to them, `Brood of vipers! who did shew you to flee from the coming wrath?
Cross Reference Matthew 5:20 in Marathi 20 मी तुम्हाला सांगतो, नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी ह्यांच्यापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.
Matthew 12:24 in Marathi 24 परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.”
Matthew 12:34 in Marathi 34 अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.
Matthew 15:12 in Marathi 12 नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?
Matthew 16:6 in Marathi 6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
Matthew 16:11 in Marathi 11 मी भाकरी विषयी तुम्हाला बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हाला कसे समजत नाही?
Matthew 22:15 in Marathi 15 मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
Matthew 22:23 in Marathi 23 पुनरूत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले,
Matthew 22:34 in Marathi 34 येशूने सदूकी लोकांना निरूत्तर केले. असे एेकून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.
Matthew 23:13 in Marathi 13 “अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो,तुम्हाला हाय हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
Matthew 23:33 in Marathi 33 “तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात!. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल?
Mark 7:3 in Marathi 3 (कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.
Mark 8:15 in Marathi 15 येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.”
Mark 12:13 in Marathi 13 नंतर त्यांनी त्याला चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परूशी व हेरोदी यांना त्याच्याकडे पाठवले.
Mark 12:18 in Marathi 18 नंतर काही सदूकी त्याच्याकडे आले, जे पुनरूत्थान नाही असे समजतात त्यांनी त्याला विचारले,
Luke 3:7 in Marathi 7 त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला: “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला कोणी सावध केले?
Luke 7:30 in Marathi 30 परंतु परूशी व शास्त्री यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली.
Luke 11:39 in Marathi 39 तेव्हा प्रभू त्याला म्हणाला, “तुम्ही परूशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून लोभीपणाने व दुष्टतेने भरलेले आहात.
Luke 16:14 in Marathi 14 मग ते परूशी धनाचे लोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला.
Luke 18:11 in Marathi 11 परूशी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली, 'हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही.
John 1:24 in Marathi 24 आणि पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती.
John 7:45 in Marathi 45 मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्याला का आणल नाही?”
John 8:44 in Marathi 44 तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणं करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.
John 9:40 in Marathi 40 तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्याला म्हणाले, “आम्हीहि पण अांधळे आहोत काय?”
Acts 4:1 in Marathi 1 पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक व मंदिराचा सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.
Acts 5:17 in Marathi 17 तेव्हा प्रमुख याजक उठला, आणि तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले.
Acts 15:5 in Marathi 5 तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे.
Acts 20:31 in Marathi 31 यासाठी सावध राहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
Acts 23:6 in Marathi 6 तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे .
Acts 26:5 in Marathi 5 ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात. आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.
Romans 1:18 in Marathi 18 वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
Romans 5:9 in Marathi 9 मग, आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की, त्याच्या द्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
2 Thessalonians 1:9 in Marathi 9 आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून, आणि त्या दिवशी पवित्र जनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.
Hebrews 6:18 in Marathi 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
Hebrews 11:7 in Marathi 7 विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्याला सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्र्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्वाचा तो वारीस झाला.
1 John 3:10 in Marathi 10 ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोहि नाही.
Revelation 6:16 in Marathi 16 आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोंकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा.
Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.