Matthew 18:10 in Marathi 10 “सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका.कारण मी तुम्हाला सांगतो की,स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
Other Translations King James Version (KJV) Take heed that ye despise not one of these little ones; for I say unto you, That in heaven their angels do always behold the face of my Father which is in heaven.
American Standard Version (ASV) See that ye despise not one of these little ones; for I say unto you, that in heaven their angels do always behold the face of my Father who is in heaven.
Bible in Basic English (BBE) Let it not seem to you that one of these little ones is of no value; for I say to you that in heaven their angels see at all times the face of my Father in heaven.
Darby English Bible (DBY) See that ye do not despise one of these little ones; for I say unto you that their angels in [the] heavens continually behold the face of my Father who is in [the] heavens.
World English Bible (WEB) See that you don't despise one of these little ones, for I tell you that in heaven their angels always see the face of my Father who is in heaven.
Young's Literal Translation (YLT) `Beware! -- ye may not despise one of these little ones, for I say to you, that their messengers in the heavens do always behold the face of my Father who is in the heavens,
Cross Reference Matthew 1:20 in Marathi 20 तो असे विचार करीत असता त्याला स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन दीले, “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस , कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला अाहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
Matthew 2:13 in Marathi 13 ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नांत दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे .
Matthew 2:19 in Marathi 19 पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशांत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला,
Matthew 12:20 in Marathi 20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.
Matthew 18:6 in Marathi 6 “परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे.
Matthew 18:14 in Marathi 14 तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.
Matthew 24:31 in Marathi 31 मनुष्याचा पुत्र तुतारीच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
Luke 1:19 in Marathi 19 देवदूताने त्याला उत्तर दिले, 'मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे, आणि तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे.
Luke 10:16 in Marathi 16 जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला नाकारतो.”
Luke 16:22 in Marathi 22 मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहांमाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले.
Acts 5:19 in Marathi 19 परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले, व त्यांना बाहेर आणून म्हटले,
Acts 10:3 in Marathi 3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टान्त झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”
Acts 12:7 in Marathi 7 तेव्हा पाहा, अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्याला उठवले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या.
Acts 12:15 in Marathi 15 विश्वासणारे रुदाला म्हणाले, “तू बावचळलीस!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे!”
Acts 12:23 in Marathi 23 आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने त्यावर प्रहार केला. तो किडे पडून मेला.
Acts 27:23 in Marathi 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ती मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
Romans 14:1 in Marathi 1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
Romans 14:10 in Marathi 10 मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
Romans 14:13 in Marathi 13 तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
Romans 14:21 in Marathi 21 मांस न खाणे किंवा द्राक्षारस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.
Romans 15:1 in Marathi 1 म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा, आणि स्वतःला संतुष्ट करू नये.
1 Corinthians 8:8 in Marathi 8 पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही, किंवा खाण्याने अधिक ठरत नाही.
1 Corinthians 9:22 in Marathi 22 आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्व काही करून मी कित्येकांचे तारण करावे.
1 Corinthians 11:22 in Marathi 22 खाण्यापिण्यासाठी तुम्हाला घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजविता? मी तुम्हाला काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करीत नाही.
1 Corinthians 16:11 in Marathi 11 यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला शांतीने पाठवा. कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.
2 Corinthians 10:1 in Marathi 1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
2 Corinthians 10:10 in Marathi 10 कारण ते म्हणतात की, ''त्यांची पत्रे गंभीर व जोरदार असतात, पण तो शरीराने अशक्त आहे आणि त्याचे बोलणे एेकण्याच्या लायकीचे नसते.''
Galatians 4:13 in Marathi 13 प्रथम तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळें मिळाला हे तुम्हाला माहित आहे.
Galatians 6:1 in Marathi 1 बंधूंनो, कोणी माणूस अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्याला सौम्यतेच्या आत्म्याने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.
1 Thessalonians 4:8 in Marathi 8 म्हणून जो कोणी नाकार करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा नाकार करतो.
1 Timothy 4:12 in Marathi 12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .
Hebrews 1:14 in Marathi 14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?
Revelation 8:2 in Marathi 2 नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात तुताऱ्या देण्यात आल्या.