Matthew 10:2 in Marathi 2 बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)आणि त्याचा भाऊ अंद्रिया,जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
Other Translations King James Version (KJV) Now the names of the twelve apostles are these; The first, Simon, who is called Peter, and Andrew his brother; James the son of Zebedee, and John his brother;
American Standard Version (ASV) Now the names of the twelve apostles are these: The first, Simon, who is called Peter, and Andrew his brother; James the `son' of Zebedee, and John his brother;
Bible in Basic English (BBE) Now the names of the twelve are these: The first, Simon, who is named Peter, and Andrew, his brother; James, the son of Zebedee, and John, his brother;
Darby English Bible (DBY) Now the names of the twelve apostles are these: first, Simon, who was called Peter, and Andrew his brother; James the [son] of Zebedee, and John his brother;
World English Bible (WEB) Now the names of the twelve apostles are these. The first, Simon, who is called Peter; Andrew, his brother; James the son of Zebedee; John, his brother;
Young's Literal Translation (YLT) And of the twelve apostles the names are these: first, Simon, who is called Peter, and Andrew his brother; James of Zebedee, and John his brother;
Cross Reference Matthew 4:18 in Marathi 18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते.
Matthew 4:21 in Marathi 21 तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले.
Matthew 16:16 in Marathi 16 शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
Matthew 17:1 in Marathi 1 मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले.
Matthew 20:20 in Marathi 20 त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्याला एक विनंति केली.
Matthew 26:37 in Marathi 37 येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दुःखी व कासावीस होऊ लागला.
Mark 1:16 in Marathi 16 येशू गालीलाच्या समुद्राजवळून जात असता तेव्हा त्याला शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
Mark 1:29 in Marathi 29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.
Mark 3:16 in Marathi 16 मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्याला पेत्र हे नाव दिले.
Mark 13:3 in Marathi 3 येशू मंदिरासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्याला एकांतात विचारले,
Luke 5:10 in Marathi 10 तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे ही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.
Luke 6:13 in Marathi 13 जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले व त्यांना 'प्रेषित' असे नाव दिले.
Luke 9:10 in Marathi 10 मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्याला सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नांवाच्या नगराकडे एकीकडे गेला.
Luke 11:49 in Marathi 49 यामुळे देवाचे ज्ञानसुध्दा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
Luke 22:8 in Marathi 8 तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणांसाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.
Luke 22:14 in Marathi 14 वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला.
John 1:40 in Marathi 40 योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.
John 6:8 in Marathi 8 त्याच्या शिष्यांतला एक जण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला,
John 12:22 in Marathi 22 फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले.
John 13:23 in Marathi 23 तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता.
John 20:2 in Marathi 2 तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हाला माहीत नाही.”
John 21:2 in Marathi 2 शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालिलातील काना येथील नथनेल व जब्दीचे पुत्र, आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.
John 21:20 in Marathi 20 तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालतांना पाहिले.
John 21:24 in Marathi 24 जो ह्या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे.
Acts 1:13 in Marathi 13 आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय,अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते तिथे गेले;
Acts 1:26 in Marathi 26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.
Acts 3:1 in Marathi 1 आणि पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस, नवव्या ताशी वर मंदिरात जात होते.
Acts 12:2 in Marathi 2 योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले.
1 Corinthians 15:7 in Marathi 7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
Ephesians 4:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताने स्वतःच काही लोकांना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक,पाळक, आणि शिक्षक असे दाने दिली.
Hebrews 3:1 in Marathi 1 म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहो, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा प्रमुख याजक आहे.
1 Peter 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
1 John 1:3 in Marathi 3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
2 John 1:1 in Marathi 1 वडिलांकडून, देवाने निवडलेली बाई व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो, आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुध्दा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.
3 John 1:1 in Marathi 1 प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरेपणात प्रीती करणारा वडील ह्याज कडून.
Revelation 1:1 in Marathi 1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ते देवाने त्याला, a ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी, दिले आहे, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळवण्यास सांगितले.
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Revelation 18:20 in Marathi 20 “हे स्वर्गा, अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा; कारण तिच्या न्यायनिवाड्यात तुमचा न्याय केला आहे. ”
Revelation 22:8 in Marathi 8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो.