Mark 14:18 in Marathi 18 मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
Other Translations King James Version (KJV) And as they sat and did eat, Jesus said, Verily I say unto you, One of you which eateth with me shall betray me.
American Standard Version (ASV) And as they sat and were eating, Jesus said, Verily I say unto you, One of you shall betray me, `even' he that eateth with me.
Bible in Basic English (BBE) And while they were seated taking food, Jesus said, Truly I say to you, One of you will be false to me, one who is taking food with me.
Darby English Bible (DBY) And as they lay at table and were eating, Jesus said, Verily I say to you, One of you shall deliver me up; he who is eating with me.
World English Bible (WEB) As they sat and were eating, Jesus said, "Most assuredly I tell you, one of you will betray me -- he who eats with me."
Young's Literal Translation (YLT) and as they are reclining, and eating, Jesus said, `Verily I say to you -- one of you, who is eating with me -- shall deliver me up.'
Cross Reference Matthew 5:18 in Marathi 18 कारण मी तुम्हास खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी हीं नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रांतील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
Matthew 6:2 in Marathi 2 म्हणून जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हाला खचीत सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे.
Matthew 6:5 in Marathi 5 “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकास दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 6:16 in Marathi 16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 26:21 in Marathi 21 जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो तुमच्या....की एक जण माझा विश्वासघात करील.
Mark 3:28 in Marathi 28 मी तुम्हास खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
Mark 6:11 in Marathi 11 आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.”
Mark 8:12 in Marathi 12 आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचीत सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.”
Mark 9:1 in Marathi 1 येशू त्या लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की. ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
Mark 9:41 in Marathi 41 मी तुम्हाला खचीत सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हाला जो काेणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.
Mark 10:15 in Marathi 15 मी तुम्हास खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.”
Mark 10:29 in Marathi 29 येशू म्हणाला, “मी तुम्हाला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्या करता व सुवार्तेकरता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे
Mark 14:9 in Marathi 9 मी तुम्हाला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
Mark 14:25 in Marathi 25 मी तुम्हाला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”
Luke 4:24 in Marathi 24 मी तुम्हाला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतः:च्या गावात स्वीकारला जात नाही.
Luke 11:51 in Marathi 51 होय, मी तुम्हास खरोखर सांगतो की, हाबेलाच्या रक्तापासून ते देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मारल्या गेलेल्या, जखऱ्या याच्या रक्तापर्यंत या पिढीला जबाबदार धरण्यात येईल.
John 1:51 in Marathi 51 आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही ह्यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना मनुष्याच्या पुत्रावर चढत उतरत असलेले पहाल.”
John 3:3 in Marathi 3 येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
John 3:5 in Marathi 5 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
John 3:11 in Marathi 11 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.
John 5:19 in Marathi 19 ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून कांहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 6:26 in Marathi 26 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण त्या भाकरीतून खाल्लेत आणि तृप्त झालात म्हणून माझा शोध करता.
John 6:32 in Marathi 32 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो.
John 6:47 in Marathi 47 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.
John 6:70 in Marathi 70 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बारा जणांना निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एक जण सैतान आहे.”
John 13:21 in Marathi 21 असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.”
John 13:38 in Marathi 38 येशूने त्याला उत्तर दिले,काय? “तू माझ्यासाठी तू आपला जीव देशील? मी तुला खचीत खचीत सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”
John 21:18 in Marathi 18 “मी तुला खचीत खचीत सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”