Luke 10:2 in Marathi 2 तो त्यांना म्हणाला, पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकांत कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.''
Other Translations King James Version (KJV) Therefore said he unto them, The harvest truly is great, but the labourers are few: pray ye therefore the Lord of the harvest, that he would send forth labourers into his harvest.
American Standard Version (ASV) And he said unto them, The harvest indeed is plenteous, but the laborers are few: pray ye therefore the Lord of the harvest, that he send forth laborers into his harvest.
Bible in Basic English (BBE) And he said to them, There is much grain ready to be cut, but not enough workers: so make prayer to the Lord of the grain-fields that he will send workers to get in the grain.
Darby English Bible (DBY) And he said to them, The harvest indeed [is] great, but the workmen few; supplicate therefore the Lord of the harvest that he may send out workmen into his harvest.
World English Bible (WEB) Then he said to them, "The harvest is indeed plentiful, but the laborers are few. Pray therefore to the Lord of the harvest, that he may send out laborers into his harvest.
Young's Literal Translation (YLT) then said he unto them, `The harvest indeed `is' abundant, but the workmen few; beseech ye then the Lord of the harvest, that He may put forth workmen to His harvest.
Cross Reference Matthew 9:36 in Marathi 36 आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय्य लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.
Matthew 20:1 in Marathi 1 म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.
Mark 13:34 in Marathi 34 ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे.
Mark 16:15 in Marathi 15 तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’
Mark 16:20 in Marathi 20 शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
Luke 9:1 in Marathi 1 मग त्याने त्या बारा जणांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भुतांवर, आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला,
John 4:35 in Marathi 35 ‘अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’, असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.
Acts 8:4 in Marathi 4 विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.
Acts 11:19 in Marathi 19 स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे यरूशलेमेपासून दूर ठिकाणी फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत पांगले गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली.
Acts 13:2 in Marathi 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”
Acts 13:4 in Marathi 4 पवित्र आत्म्याच्या व्दारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीयात गेले. नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.
Acts 16:9 in Marathi 9 तेथे रात्री पौलाला असा दृष्टांन्त झाला की, मासेदोनियात कोणीएक माणुस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Acts 22:21 in Marathi 21 तेव्हा त्याने मला सांगितले, जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.
Acts 26:15 in Marathi 15 आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ प्रभूने उत्तर दिले, ‘मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस.
1 Corinthians 3:6 in Marathi 6 मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.
1 Corinthians 12:28 in Marathi 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.
1 Corinthians 15:10 in Marathi 10 पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
Ephesians 4:7 in Marathi 7 ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान दिलेले आहे.”
Philippians 2:21 in Marathi 21 कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात,ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.
Philippians 2:25 in Marathi 25 तरी मला माझा बंधू, आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा जासुद, आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले.
Philippians 2:30 in Marathi 30 कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यांत घातला व तो मरता मरता वाचला.
Colossians 1:29 in Marathi 29 ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्याठायी सामर्थ्यानें त्याचे कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.
Colossians 4:12 in Marathi 12 ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्यें सर्वदा तुम्हांसाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे.
1 Thessalonians 2:9 in Marathi 9 बंधूनो, आमचे श्रम व कष्ट ह्याची आठवण तुम्हास आहे; तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.
1 Thessalonians 5:12 in Marathi 12 आणि बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
2 Thessalonians 3:1 in Marathi 1 बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की,जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगति व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
1 Timothy 1:12 in Marathi 12 ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे.
1 Timothy 4:10 in Marathi 10 याकरता आम्ही श्रम व खटपट करतो, कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा , त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे .
1 Timothy 4:15 in Marathi 15 या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी.
1 Timothy 5:17 in Marathi 17 जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे,
2 Timothy 2:3 in Marathi 3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्या बरोबर दुःख सोस.
2 Timothy 4:5 in Marathi 5 पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
Philemon 1:1 in Marathi 1 पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान, आणि भाऊ तीमथ्य यांच्याकडून; आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन ह्यास,
Hebrews 3:6 in Marathi 6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे
Revelation 2:1 in Marathi 1 इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: “जाे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत
Revelation 11:2 in Marathi 2 पण मंदिरा बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील.