John 9:39 in Marathi 39 तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे, आणि ज्यांना दिसते त्यांनी अांधळे व्हावे.”
Other Translations King James Version (KJV) And Jesus said, For judgment I am come into this world, that they which see not might see; and that they which see might be made blind.
American Standard Version (ASV) And Jesus said, For judgment came I into this world, that they that see not may see; and that they that see may become blind.
Bible in Basic English (BBE) And Jesus said, I came into this world to be a judge, so that those who do not see may see, and those who see may become blind.
Darby English Bible (DBY) And Jesus said, For judgment am I come into this world, that they which see not may see, and they which see may become blind.
World English Bible (WEB) Jesus said, "I came into this world for judgment, that those who don't see may see; and that those who see may become blind."
Young's Literal Translation (YLT) And Jesus said, `For judgment I to this world did come, that those not seeing may see, and those seeing may become blind.'
Cross Reference Matthew 6:23 in Marathi 23 पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.
Matthew 11:5 in Marathi 5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
Matthew 13:13 in Marathi 13 ह्यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.
Luke 1:79 in Marathi 79 तीच्याकडून जे अंधारांत आहेत व मृत्यूच्या छायेंत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.
Luke 2:34 in Marathi 34 आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, व त्याची आई मरीया हिला म्हटले, पाहा, इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यांसाठी आणि ज्याविरूध्द बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे.
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
Luke 7:21 in Marathi 21 त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली.
Luke 11:34 in Marathi 34 डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे.
Luke 13:30 in Marathi 30 जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.
John 3:17 in Marathi 17 कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
John 3:19 in Marathi 19 आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;
John 5:22 in Marathi 22 पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे.
John 8:12 in Marathi 12 पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
John 8:15 in Marathi 15 तुम्ही देहानुसार न्याय करता; मी कुणाचा न्याय करीत नाही.
John 9:25 in Marathi 25 ह्यावरून त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मी जाणत नाही. मी एक गोष्ट जाणतो; मी पूर्वी अांधळा होतो आणि आता मला दिसते.”
John 9:36 in Marathi 36 त्याने उत्तर दिले, “महाराज मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”
John 12:40 in Marathi 40 ‘त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये,वळू नये व मी त्यांना बरे करू नये.म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे;
John 12:46 in Marathi 46 जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Romans 11:7 in Marathi 7 मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले.
2 Corinthians 2:16 in Marathi 16 ज्या लाेकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास ; आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत. आणि ह्या गोष्टींसाठी कोण लायक आहे?
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
Ephesians 5:14 in Marathi 14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो. म्हणून असे म्हटले आहे “हे झोपलेल्या जागा हो, अाणि मेलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल”.
2 Thessalonians 2:10 in Marathi 10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांंनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अदभूते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
1 John 2:11 in Marathi 11 पण जो आपल्या भावाचा व्देष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही. कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.