John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Other Translations King James Version (KJV) So when they had dined, Jesus saith to Simon Peter, Simon, son of Jonas, lovest thou me more than these? He saith unto him, Yea, Lord; thou knowest that I love thee. He saith unto him, Feed my lambs.
American Standard Version (ASV) So when they had broken their fast, Jesus saith to Simon Peter, Simon, `son' of John, lovest thou me more than these? He saith unto him, Yea, Lord; thou knowest that I love thee. He saith unto him, Feed my lambs.
Bible in Basic English (BBE) Then when they had taken food, Jesus said to Simon Peter, Simon, son of John, is your love for me greater than the love of these others? He said to him, Yes, Lord; you are certain of my love for you. He said to him, Then give my lambs food.
Darby English Bible (DBY) When therefore they had dined, Jesus says to Simon Peter, Simon, [son] of Jonas, lovest thou me more than these? He says to him, Yea, Lord; thou knowest that I am attached to thee. He says to him, Feed my lambs.
World English Bible (WEB) So when they had eaten their breakfast, Jesus said to Simon Peter, "Simon, son of Jonah, do you love me more than these?" He said to him, "Yes, Lord; you know that I have affection for you." He said to him, "Feed my lambs."
Young's Literal Translation (YLT) When, therefore, they dined, Jesus saith to Simon Peter, `Simon, `son' of Jonas, dost thou love me more than these?' he saith to him, `Yes, Lord; thou hast known that I dearly love thee;' he saith to him, `Feed my lambs.'
Cross Reference Matthew 10:37 in Marathi 37 “जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही.
Matthew 16:17 in Marathi 17 येशू म्हणाला, “शिमोन, बार्येाना, तू आशीर्वादित आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
Matthew 18:10 in Marathi 10 “सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका.कारण मी तुम्हाला सांगतो की,स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
Matthew 25:34 in Marathi 34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.
Matthew 26:33 in Marathi 33 उत्तर देताना पेत्र म्हणाला, “इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.”
Matthew 26:35 in Marathi 35 पेत्र म्हणाला, “मला तुझ्याबरोबर मराव लागले तरी मी तुला नाकारणार नाही.” आणि इतर शिष्यसुध्दा तसेच म्हणाले.
Mark 14:29 in Marathi 29 पेत्र म्हणाला, “ जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.
Luke 12:32 in Marathi 32 “हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हाला त्याचे राज्य द्यावे यात पित्याला संतोष वाटतो.
Luke 22:32 in Marathi 32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.
John 1:42 in Marathi 42 त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”
John 8:42 in Marathi 42 येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो, मी स्वतः होऊन आलो नाही, पण त्याने मला पाठवले.
John 13:37 in Marathi 37 पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”
John 14:15 in Marathi 15 माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
John 16:27 in Marathi 27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
John 21:7 in Marathi 7 तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो प्रभू आहे, प्रभू आहे तेव्हा तो उघडा असल्यामुळे त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि समुद्रात उडी टाकली.
John 21:12 in Marathi 12 येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहा हे त्याला विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही.
John 21:16 in Marathi 16 तो पुन्हा दुसर्यांदा त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणाला, “माझी मेंढरे राख.”
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Romans 14:1 in Marathi 1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
Romans 15:1 in Marathi 1 म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा, आणि स्वतःला संतुष्ट करू नये.
1 Corinthians 3:1 in Marathi 1 बंधूंनो आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.
1 Corinthians 8:11 in Marathi 11 आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मेला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या ह्या ज्ञानामुळे नाश होतो.
1 Corinthians 16:21 in Marathi 21 मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा नमस्कार लिहीत आहे.
2 Corinthians 5:14 in Marathi 14 कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरते. कारण आम्ही असे मानतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले,
Galatians 5:6 in Marathi 6 ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही; आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
Ephesians 6:24 in Marathi 24 जे सर्व जण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
1 Timothy 4:15 in Marathi 15 या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी.
Hebrews 4:13 in Marathi 13 आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हाला सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
Hebrews 12:12 in Marathi 12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
1 Peter 1:8 in Marathi 8 तुम्ही त्याला बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्याला पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसित होता.
1 Peter 2:2 in Marathi 2 परमेश्वशवर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणू नूतन जन्मलेल्या बालकांसारखे शुध्द दुधाची इच्छा धरा.
1 Peter 2:25 in Marathi 25 कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहा.
1 Peter 5:1 in Marathi 1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
1 John 4:19 in Marathi 19 पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.
1 John 5:1 in Marathi 1 येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरहि प्रीती करतो.
Revelation 2:23 in Marathi 23 तर मी तिच्या मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे . मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन.