John 21 in Marathi

1 आणि ह्या गोष्टीनंतर पुन्हा तिबिर्याच्या समुद्राजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशा प्रकारे स्वतःस प्रकट केले.

2 शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालिलातील काना येथील नथनेल व जब्दीचे पुत्र, आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.

3 शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्याला म्हणतात, “आम्हीपण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून मचव्यांत चढले आणि त्या रात्री त्यांनी कांहीही धरले नाही.

4 पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.

5 तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्याला म्हणाले, “नाही.”

6 आणि तो त्यांना म्हणाला, “मचव्याच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हाला मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले, आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना.

7 तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो प्रभू आहे, प्रभू आहे तेव्हा तो उघडा असल्यामुळे त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि समुद्रात उडी टाकली.

8 आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले. कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते.

9 तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली.

10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”

11 तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणिले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.

12 येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहा हे त्याला विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही.

13 तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली.

14 येशू मेलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.

15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”

16 तो पुन्हा दुसर्‍यांदा त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणाला, “माझी मेंढरे राख.”

17 तो तिसर्‍यांदा त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, ‘तू माझ्यावर प्रीती करतोस काय?’ आणि तो त्याला म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्याला म्हणतो, “माझी मेंढरे चार.”

18 “मी तुला खचीत खचीत सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”

19 तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला. आणि हे बोलल्यावर तो त्याला म्हणतो, “माझ्यामागे ये.”

20 तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालतांना पाहिले.

21 म्हणून, त्याला बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?”

22 येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.”

23 तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्याला म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण ‘मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?’

24 जो ह्या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे.

25 आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगांत देखील मावणार नाहीत असे मला वाटते.