John 20:17 in Marathi 17 येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.’”
Other Translations King James Version (KJV) Jesus saith unto her, Touch me not; for I am not yet ascended to my Father: but go to my brethren, and say unto them, I ascend unto my Father, and your Father; and to my God, and your God.
American Standard Version (ASV) Jesus saith to her, Touch me not; for I am not yet ascended unto the Father: but go unto my brethren, and say to them, I ascend unto my Father and your Father, and my God and your God.
Bible in Basic English (BBE) Jesus said to her, Do not put your hand on me, for I have not gone up to the Father: but go to my brothers and say to them, I go up to my Father and your Father, to my God and your God.
Darby English Bible (DBY) Jesus says to her, Touch me not, for I have not yet ascended to my Father; but go to my brethren and say to them, I ascend to my Father and your Father, and [to] my God and your God.
World English Bible (WEB) Jesus said to her, "Don't touch me, for I haven't yet ascended to my Father; but go to my brothers, and tell them, 'I am ascending to my Father and your Father, to my God and your God.'"
Young's Literal Translation (YLT) Jesus saith to her, `Be not touching me, for I have not yet ascended unto my Father; and be going on to my brethren, and say to them, I ascend unto my Father, and your Father, and to my God, and to your God.'
Cross Reference Matthew 12:50 in Marathi 50 कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”
Matthew 25:40 in Marathi 40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
Matthew 28:7 in Marathi 7 आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, ‘तो मरणातून उठला आहे.आणि बघा, तो तुमच्यापुढे गालिलात जात आहे. आणि तुम्ही त्याला तेथे पाहाल.’पाहा, “मी तुम्हाला सांगितले आहे.”
Matthew 28:9 in Marathi 9 मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो.” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याला नमन केले.
Mark 16:19 in Marathi 19 मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
Luke 10:4 in Marathi 4 पिशवी किंवा झोळी किंवा वाहणा घेऊ नका; व वाटेने कोणाला सलाम करू नका.
Luke 24:49 in Marathi 49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा,
John 1:12 in Marathi 12 पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
John 7:33 in Marathi 33 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडावेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.
John 13:1 in Marathi 1 आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता ह्या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, ह्या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
John 13:3 in Marathi 3 येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते, आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
John 14:2 in Marathi 2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 14:28 in Marathi 28 ‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही एेकले आहे.माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.
John 16:28 in Marathi 28 मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
John 17:5 in Marathi 5 तर आता, हे माझ्या बापा, हे जग होण्याआधी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.
John 17:11 in Marathi 11 आणि आता, ह्यापुढे मी जगात नाही; पण ते जगांत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
John 17:25 in Marathi 25 हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे .
John 20:27 in Marathi 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर, आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.”
Romans 8:14 in Marathi 14 कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवितो ते देवाचे पुत्र आहेत.
Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
2 Corinthians 6:18 in Marathi 18 आणि मी तुम्हाला पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो.’
Galatians 3:26 in Marathi 26 पण ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहा.
Galatians 4:6 in Marathi 6 आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने‘अब्बा बापा,’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे; ‘
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 4:8 in Marathi 8 “ वचन असे म्हणते. “जेव्हा तो उच्चस्थानी चढला, तेव्हा त्याने युध्दकैदयास कैद करून नेले, आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.,
Hebrews 2:11 in Marathi 11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही.
Hebrews 8:10 in Marathi 10 “त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील.
Hebrews 11:16 in Marathi 16 पण आता, ते अधिक चांगल्या म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
1 John 3:2 in Marathi 2 प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे अाम्हाला माहीत नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.
Revelation 21:3 in Marathi 3 आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, ‘पाहा'! देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील. ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.
Revelation 21:7 in Marathi 7 जो विजय मिळवतो त्याला ह्या सर्व गोष्टी वारशान मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.