John 16:22 in Marathi 22 आणि म्हणून, आता तुम्हाला दुःख झाले आहे; तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल, आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणी हिरावून घेणार नाही.
Other Translations King James Version (KJV) And ye now therefore have sorrow: but I will see you again, and your heart shall rejoice, and your joy no man taketh from you.
American Standard Version (ASV) And ye therefore now have sorrow: but I will see you again, and your heart shall rejoice, and your joy no one taketh away from you.
Bible in Basic English (BBE) So you have sorrow now: but I will see you again, and your hearts will be glad, and no one will take away your joy.
Darby English Bible (DBY) And ye now therefore have grief; but I will see you again, and your heart shall rejoice, and your joy no one takes from you.
World English Bible (WEB) Therefore you now have sorrow, but I will see you again, and your heart will rejoice, and no one will take your joy away from you.
Young's Literal Translation (YLT) `And ye, therefore, now, indeed, have sorrow; and again I will see you, and your heart shall rejoice, and your joy no one doth take from you,
Cross Reference Matthew 28:8 in Marathi 8 तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या.व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.
Luke 10:42 in Marathi 42 पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
Luke 16:25 in Marathi 25 परंतु अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्याला आराम मिळत आहे व तू दु:खात आहेस.
Luke 19:26 in Marathi 26 धन्याने उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल ते सुध्दा काढून घेतले जाईल.
Luke 24:41 in Marathi 41 ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”
Luke 24:51 in Marathi 51 तो आशीर्वाद देत असतानाच तो वर आकाशात घेतला गेला.
John 4:14 in Marathi 14 परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”
John 14:1 in Marathi 1 तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरहि विश्वास ठेवा.
John 14:27 in Marathi 27 मी तुम्हास शांती देऊन ठेवितों; मी आपली शांती तुम्हास देतों. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये.
John 16:6 in Marathi 6 पण मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळें तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.
John 16:16 in Marathi 16 “थोड्या वेळाने,मी तुम्हाला दिसणार नाही; आणि पुन्हा, थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
John 16:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
John 20:19 in Marathi 19 तेव्हा त्याच दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी,शिष्य जेथे जमले होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळें,बंद असता. येशू आला मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
John 21:7 in Marathi 7 तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो प्रभू आहे, प्रभू आहे तेव्हा तो उघडा असल्यामुळे त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि समुद्रात उडी टाकली.
Acts 2:46 in Marathi 46 ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत.
Acts 5:41 in Marathi 41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;
Acts 13:52 in Marathi 52 इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले .
Acts 16:25 in Marathi 25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
Acts 20:23 in Marathi 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो
Romans 8:35 in Marathi 35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?
1 Thessalonians 3:7 in Marathi 7 ह्यामुळे बंधूनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले;
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
Hebrews 6:18 in Marathi 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
Hebrews 10:34 in Marathi 34 जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला. आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
1 Peter 1:8 in Marathi 8 तुम्ही त्याला बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्याला पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसित होता.
1 Peter 4:13 in Marathi 13 उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लसित व्हावे.