John 16:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
Other Translations King James Version (KJV) Verily, verily, I say unto you, That ye shall weep and lament, but the world shall rejoice: and ye shall be sorrowful, but your sorrow shall be turned into joy.
American Standard Version (ASV) Verily, verily, I say unto you, that ye shall weep and lament, but the world shall rejoice: ye shall be sorrowful, but your sorrow shall be turned into joy.
Bible in Basic English (BBE) Truly I say to you, You will be weeping and sorrowing, but the world will be glad: you will be sad, but your sorrow will be turned into joy.
Darby English Bible (DBY) Verily, verily, I say to you, that ye shall weep and lament, ye, but the world shall rejoice; and ye will be grieved, but your grief shall be turned to joy.
World English Bible (WEB) Most assuredly I tell you, that you will weep and lament, but the world will rejoice. You will be sorrowful, but your sorrow will be turned into joy.
Young's Literal Translation (YLT) verily, verily, I say to you, that ye shall weep and lament, and the world will rejoice; and ye shall be sorrowful, but your sorrow joy will become.
Cross Reference Matthew 5:4 in Marathi 4 ‘जे शोक करीत आहेत’, ते आशीर्वादित आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल’.
Matthew 21:38 in Marathi 38 “पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.’
Matthew 27:39 in Marathi 39 जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून
Matthew 27:62 in Marathi 62 त्या दिवसाला तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे गेले.
Mark 14:72 in Marathi 72 आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व ढसढसा रडला.
Mark 15:29 in Marathi 29 जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, ‘अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!
Mark 16:10 in Marathi 10 ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले.
Luke 6:21 in Marathi 21 अहो जे तुम्ही आता भुकेले आहा, ते तुम्ही आशीर्वादित आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
Luke 22:45 in Marathi 45 आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तों ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले.
Luke 22:62 in Marathi 62 मग तो बाहेर जाऊन अतिदु:खाने रडला.
Luke 23:27 in Marathi 27 लोकांचा व स्त्रीयाचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या.
Luke 23:47 in Marathi 47 जेव्हा रोमी सेनाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, 'खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.'
Luke 24:17 in Marathi 17 येशू त्यांना म्हणाला, 'चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?' चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले.
Luke 24:21 in Marathi 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील. आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.
John 16:6 in Marathi 6 पण मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळें तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.
John 16:33 in Marathi 33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”
John 19:25 in Marathi 25 पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मग्दाली ह्या उभ्या होत्या.
John 20:20 in Marathi 20 आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखविली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले
Acts 2:46 in Marathi 46 ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत.
Acts 5:41 in Marathi 41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;
Romans 5:2 in Marathi 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही, त्याच्या द्वारे विश्वासाने, आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
Romans 5:11 in Marathi 11 इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.
2 Corinthians 6:10 in Marathi 10 आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले, आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
1 Thessalonians 1:6 in Marathi 6 तुम्ही फार संकटांत असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
James 1:2 in Marathi 2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
1 Peter 1:6 in Marathi 6 आणि ह्या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हाला थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे
Revelation 7:14 in Marathi 14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.
Revelation 11:10 in Marathi 10 आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील आणि एकमेकांना भेटी पाठवतील. कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्यांस अतोनात पीडले होते.
Revelation 18:7 in Marathi 7 तिने स्वतःला जेवढं गौरव व एेषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या. कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, ‘मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही. ’