John 14:27 in Marathi 27 मी तुम्हास शांती देऊन ठेवितों; मी आपली शांती तुम्हास देतों. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये.
Other Translations King James Version (KJV) Peace I leave with you, my peace I give unto you: not as the world giveth, give I unto you. Let not your heart be troubled, neither let it be afraid.
American Standard Version (ASV) Peace I leave with you; my peace I give unto you: not as the world giveth, give I unto you. Let not your heart be troubled, neither let it be fearful.
Bible in Basic English (BBE) May peace be with you; my peace I give to you: I give it not as the world gives. Let not your heart be troubled; let it be without fear.
Darby English Bible (DBY) I leave peace with you; I give *my* peace to you: not as the world gives do I give to you. Let not your heart be troubled, neither let it fear.
World English Bible (WEB) Peace I leave with you. My peace I give to you; not as the world gives, give I to you. Don't let your heart be troubled, neither let it be fearful.
Young's Literal Translation (YLT) `Peace I leave to you; my peace I give to you, not according as the world doth give do I give to you; let not your heart be troubled, nor let it be afraid;
Cross Reference Matthew 10:26 in Marathi 26 “म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.
Luke 1:79 in Marathi 79 तीच्याकडून जे अंधारांत आहेत व मृत्यूच्या छायेंत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.
Luke 2:14 in Marathi 14 परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या माणसांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.
Luke 10:5 in Marathi 5 तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेथे पहिल्याने, या घराला शांती असो, असे म्हणा.
Luke 12:4 in Marathi 4 परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.
John 14:1 in Marathi 1 तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरहि विश्वास ठेवा.
John 16:33 in Marathi 33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”
John 20:19 in Marathi 19 तेव्हा त्याच दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी,शिष्य जेथे जमले होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळें,बंद असता. येशू आला मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
John 20:21 in Marathi 21 तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हाला पाठवतो.”
John 20:26 in Marathi 26 आणि पुन्हा, आठ दिवसांनी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दारे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला, आणि म्हणाला, “तुम्हाला शांती असो.”
Acts 10:36 in Marathi 36 देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताव्दारे शांती जगात आली आहे. येशू सर्वाचा प्रभू आहे!
Acts 18:9 in Marathi 9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको!
Romans 1:7 in Marathi 7 रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्र जन होण्यास बोलावलेल्यांसः देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.
Romans 5:1 in Marathi 1 आता, आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत, म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.
Romans 5:10 in Marathi 10 कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण तारले जाऊ.
Romans 8:6 in Marathi 6 कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.
Romans 15:13 in Marathi 13 आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
1 Corinthians 1:3 in Marathi 3 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो.
2 Corinthians 5:18 in Marathi 18 हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली;
Galatians 1:3 in Marathi 3 देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Galatians 6:16 in Marathi 16 आणि जे ह्या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.
Ephesians 2:14 in Marathi 14 “कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि परराष्ट्रीय या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हाला एकमेकापासून दुभागणारी वैराची, मधली आडभिंत त्याने पाडून टाकली.”
Philippians 4:7 in Marathi 7 म्हणजे सर्व बुध्दीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
Colossians 1:2 in Marathi 2 कलस्सैमधील येथील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांसः देव आपला पिता ह्याजकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
Colossians 1:20 in Marathi 20 आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टींचा, त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले.
Colossians 3:15 in Marathi 15 ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
2 Thessalonians 1:2 in Marathi 2 देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.
2 Thessalonians 3:16 in Marathi 16 शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
2 Timothy 1:7 in Marathi 7 कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.
Hebrews 7:2 in Marathi 2 व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग त्याला (मलकीसदेकाला) दिला.मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो.
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
Revelation 1:4 in Marathi 4 योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 21:8 in Marathi 8 पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय. ”