Cross Reference Matthew 1:18 in Marathi 18 येशू ख्रिस्ताचा जन्म ह्याप्रकारे झाला. त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झाली होती,पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.
Matthew 1:20 in Marathi 20 तो असे विचार करीत असता त्याला स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन दीले, “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस , कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला अाहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
Matthew 3:11 in Marathi 11 मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या चपला उचलून चालण्याची देखील माझी लायकी नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे .
Matthew 28:19 in Marathi 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
Mark 12:36 in Marathi 36 दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यत, तू माझ्या उजवीकडे बैस.”
Mark 13:11 in Marathi 11 ते तुम्हाला अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.
Luke 1:15 in Marathi 15 तो देवाच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य पिणार नाही. तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
Luke 1:35 in Marathi 35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
Luke 1:41 in Marathi 41 जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.
Luke 1:67 in Marathi 67 जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला , आणि त्याने ही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
Luke 2:25 in Marathi 25 तेव्हा पाहा, यरूशलेमेत शिमोन नांवाचा कोणी एक मनुष्य होता. तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता. तो इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता.
Luke 3:22 in Marathi 22 आणि पवित्र आत्मा देह रूपाने कबुतरा प्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.
Luke 11:13 in Marathi 13 जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देेण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
Luke 24:49 in Marathi 49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा,
John 2:22 in Marathi 22 म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
John 6:45 in Marathi 45 संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.
John 7:39 in Marathi 39 ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
John 12:16 in Marathi 16 या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर,त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते.
John 14:16 in Marathi 16 मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ राहावे.
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:7 in Marathi 7 तरीपण मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन;
John 16:13 in Marathi 13 पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि हाेणार्या गोष्टी तुम्हाला कळवील.
John 20:22 in Marathi 22 एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.
Acts 1:2 in Marathi 2 त्या दिवसा पर्यत पवित्र आत्म्याने जे जे आज्ञापिले व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला.
Acts 1:4 in Marathi 4 तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा.
Acts 1:8 in Marathi 8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल,आणि यरूशलेमेत,सर्व यहूदीयांत,शमरोनांत व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.
Acts 2:4 in Marathi 4 तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले.
Acts 2:33 in Marathi 33 म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
Acts 5:3 in Marathi 3 तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?
Acts 7:51 in Marathi 51 अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता; जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.
Acts 7:55 in Marathi 55 परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
Acts 11:16 in Marathi 16 तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभू म्हणाला होता, ‘योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे. पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल!’
Acts 13:2 in Marathi 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”
Acts 13:4 in Marathi 4 पवित्र आत्म्याच्या व्दारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीयात गेले. नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.
Acts 15:8 in Marathi 8 आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
Acts 15:28 in Marathi 28 कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले;
Acts 16:6 in Marathi 6 नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले;
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Acts 20:35 in Marathi 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे, व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.”‘
Acts 28:25 in Marathi 25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या व्दारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होताः
Romans 5:5 in Marathi 5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात, आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाची प्रीती ओतली जात आहे.
Romans 14:17 in Marathi 17 कारण, खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्व,शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
Romans 15:13 in Marathi 13 आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
Romans 15:16 in Marathi 16 ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे, परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.
1 Corinthians 2:10 in Marathi 10 ते देवाने आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे. कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो.
1 Corinthians 6:19 in Marathi 19 किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही?
1 Corinthians 12:3 in Marathi 3 म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभू आहे,” असे म्हणू शकत नाही.
2 Corinthians 6:6 in Marathi 6 शुध्दतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;
2 Corinthians 13:14 in Marathi 14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Ephesians 1:13 in Marathi 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुध्दा सत्याचे वचन आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 4:30 in Marathi 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.
1 Thessalonians 1:5 in Marathi 5 कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे,तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाला कळविण्यात आली;तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलों हे तुम्हास ठाऊक आहे.
1 Thessalonians 4:8 in Marathi 8 म्हणून जो कोणी नाकार करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा नाकार करतो.
2 Timothy 1:14 in Marathi 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
Titus 3:5 in Marathi 5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीकरणाने तारले.
Hebrews 2:4 in Marathi 4 देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
Hebrews 3:7 in Marathi 7 म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
Hebrews 9:8 in Marathi 8 याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही.
Hebrews 10:15 in Marathi 15 पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,
1 Peter 1:12 in Marathi 12 त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हाला सुवार्ता सांगणार्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यात ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
2 Peter 1:21 in Marathi 21 कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
1 John 2:20 in Marathi 20 पण जो पवित्र त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे.
1 John 2:27 in Marathi 27 पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक -तो सत्य आहे, खोटा नाही - तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
1 John 5:7 in Marathi 7 आत्मा हा साक्ष देणारा आहे,कारण आत्मा सत्य आहे.
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
Revelation 2:11 in Marathi 11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.