John 14:16 in Marathi 16 मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ राहावे.
Other Translations King James Version (KJV) And I will pray the Father, and he shall give you another Comforter, that he may abide with you for ever;
American Standard Version (ASV) And I will pray the Father, and he shall give you another Comforter, that he may be with you for ever,
Bible in Basic English (BBE) And I will make prayer to the Father and he will give you another Helper to be with you for ever,
Darby English Bible (DBY) And I will beg the Father, and he will give you another Comforter, that he may be with you for ever,
World English Bible (WEB) I will pray to the Father, and he will give you another Counselor,{Greek Parakleton: Counselor, Helper, Intercessor, Advocate, and Comfortor.} that he may be with you forever,--
Young's Literal Translation (YLT) and I will ask the Father, and another Comforter He will give to you, that he may remain with you -- to the age;
Cross Reference Matthew 28:20 in Marathi 20 आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना पाळायला शिकवा. आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”
John 4:14 in Marathi 14 परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”
John 14:14 in Marathi 14 तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
John 14:18 in Marathi 18 “मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.
John 14:26 in Marathi 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:7 in Marathi 7 तरीपण मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन;
John 16:22 in Marathi 22 आणि म्हणून, आता तुम्हाला दुःख झाले आहे; तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल, आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणी हिरावून घेणार नाही.
John 16:26 in Marathi 26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हाला म्हणत नाही.
John 17:9 in Marathi 9 त्यांच्यासाठी मी विनंती करतो,मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.
John 17:15 in Marathi 15 तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
John 17:20 in Marathi 20 “मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीहि विनंती करतो
Acts 9:31 in Marathi 31 अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालीली, शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली. आणि तिची पवित्र आत्म्याच्या साहाय्याने व भयात असता वाढत गेली.
Acts 13:52 in Marathi 52 इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले .
Romans 5:5 in Marathi 5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात, आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाची प्रीती ओतली जात आहे.
Romans 8:15 in Marathi 15 कारण तुम्हाला, पुन्हा भय धरण्यास, दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे, ‘अब्बा, बापा,’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे.
Romans 8:26 in Marathi 26 त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो.
Romans 8:34 in Marathi 34 दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मेला, हो, जो मेलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
Romans 14:17 in Marathi 17 कारण, खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्व,शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
Romans 15:13 in Marathi 13 आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Ephesians 1:13 in Marathi 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुध्दा सत्याचे वचन आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
Philippians 2:1 in Marathi 1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता,काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
Colossians 3:3 in Marathi 3 कारण तुम्ही मृत झला आहा, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलें आहे.
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
Hebrews 7:25 in Marathi 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
1 John 2:1 in Marathi 1 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हापैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.