John 12:26 in Marathi 26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करील.
Other Translations King James Version (KJV) If any man serve me, let him follow me; and where I am, there shall also my servant be: if any man serve me, him will my Father honour.
American Standard Version (ASV) If any man serve me, let him follow me; and where I am, there shall also my servant be: if any man serve me, him will the Father honor.
Bible in Basic English (BBE) If any man is my servant, let him come after me; and where I am, there will my servant be. If any man becomes my servant, my Father will give him honour.
Darby English Bible (DBY) If any one serve me, let him follow me; and where I am, there also shall be *my* servant. [And] if any one serve me, him shall the Father honour.
World English Bible (WEB) If anyone serves me, let him follow me. Where I am, there will my servant also be. If anyone serves me, the Father will honor him.
Young's Literal Translation (YLT) if any one may minister to me, let him follow me, and where I am, there also my ministrant shall be; and if any one may minister to me -- honour him will the Father.
Cross Reference Matthew 16:24 in Marathi 24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Matthew 25:21 in Marathi 21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
Mark 8:34 in Marathi 34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे.
Luke 6:46 in Marathi 46 तुम्ही मला प्रभू, प्रभू, म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही?
Luke 9:23 in Marathi 23 आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतः:ला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे.
John 10:27 in Marathi 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.
John 13:16 in Marathi 16 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, दास आपल्या धन्यापेक्षां मोठा नाही; आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा मोठा नाही.
John 14:3 in Marathi 3 आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
John 14:15 in Marathi 15 माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
John 14:21 in Marathi 21 ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन.”
John 15:20 in Marathi 20 ‘दास धन्यापेक्षां मोठा नाही' हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याहि पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील.
John 17:24 in Marathi 24 हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की,जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापने अगोदर तू माझ्यावर प्रीती केली.
John 21:22 in Marathi 22 येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.”
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
Romans 14:18 in Marathi 18 कारण, जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला संतोष देणारा व माणसांनी पारखलेला होतो.
2 Corinthians 4:5 in Marathi 5 कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो, आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत.
2 Corinthians 5:8 in Marathi 8 आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.
Galatians 1:10 in Marathi 10 मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय?मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
Ephesians 5:1 in Marathi 1 तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,
Philippians 1:23 in Marathi 23 कारण मी दोहोसंबंधाने पेचांत आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;
Colossians 3:24 in Marathi 24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल तुम्ही हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
Colossians 4:12 in Marathi 12 ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्यें सर्वदा तुम्हांसाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे.
1 Thessalonians 4:17 in Marathi 17 मग आपण जे जिवंत आहो व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
1 John 5:3 in Marathi 3 देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Revelation 14:4 in Marathi 4 स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुध्द आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकर्याला प्रथम फळ असे आहेत.