John 10:14 in Marathi 14 मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो, आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.
Other Translations King James Version (KJV) I am the good shepherd, and know my sheep, and am known of mine.
American Standard Version (ASV) I am the good shepherd; and I know mine own, and mine own know me,
Bible in Basic English (BBE) I am the good keeper; I have knowledge of my sheep, and they have knowledge of me,
Darby English Bible (DBY) I am the good shepherd; and I know those that are mine, and am known of those that are mine,
World English Bible (WEB) I am the good shepherd. I know my own, and I'm known by my own;
Young's Literal Translation (YLT) `I am the good shepherd, and I know my `sheep', and am known by mine,
Cross Reference John 10:11 in Marathi 11 मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
John 10:27 in Marathi 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
John 17:8 in Marathi 8 कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर आेळखले, आणि तू मला पाठवले.असा त्यांनी विश्वास ठेवला.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 3:19 in Marathi 19 म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे. “
Philippians 3:8 in Marathi 8 इतकेच नाही,तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली. आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 2:19 in Marathi 19 तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्याला हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे .”
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
Revelation 2:2 in Marathi 2 “तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम,कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
Revelation 2:9 in Marathi 9 “मला तुमचे दु:ख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गाेष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, (पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.)
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 2:19 in Marathi 19 “मला तुमची कामे तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे. आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे.
Revelation 3:1 in Marathi 1 सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही “ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत अाहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मेलेले आहात.
Revelation 3:8 in Marathi 8 “मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस.
Revelation 3:15 in Marathi 15 “मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते.