John 1:51 in Marathi 51 आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही ह्यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना मनुष्याच्या पुत्रावर चढत उतरत असलेले पहाल.”
Other Translations King James Version (KJV) And he saith unto him, Verily, verily, I say unto you, Hereafter ye shall see heaven open, and the angels of God ascending and descending upon the Son of man.
American Standard Version (ASV) And he saith unto him, Verily, verily, I say unto you, Ye shall see the heaven opened, and the angels of God ascending and descending upon the Son of man.
Bible in Basic English (BBE) And he said to him, Truly I say to you all, You will see heaven opening and God's angels going up and coming down on the Son of man.
Darby English Bible (DBY) And he says to him, Verily, verily, I say to you, Henceforth ye shall see the heaven opened, and the angels of God ascending and descending on the Son of man.
World English Bible (WEB) He said to him, "Most assuredly, I tell you, hereafter you will see heaven opened, and the angels of God ascending and descending on the Son of Man."
Young's Literal Translation (YLT) and he saith to him, `Verily, verily, I say to you, henceforth ye shall see the heaven opened, and the messengers of God going up and coming down upon the Son of Man.'
Cross Reference Matthew 3:16 in Marathi 16 मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबूतरासारखा उतरताना व आपणावर येतांना पाहीला ,
Matthew 4:11 in Marathi 11 मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले
Matthew 8:20 in Marathi 20 येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशांतील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.
Matthew 9:6 in Marathi 6 परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की, मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.”
Matthew 16:13 in Marathi 13 येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
Matthew 16:27 in Marathi 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
Matthew 25:31 in Marathi 31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.
Matthew 26:24 in Marathi 24 जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा तो जातो खरा; पण जो त्याचा विश्वासघात करतो त्याला धिक्कार असो! तो मनुष्य जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.
Mark 1:10 in Marathi 10 येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आहे आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्याला दिसले.
Mark 14:62 in Marathi 62 येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
Luke 2:9 in Marathi 9 अचानक, देवाचा एक दूत त्यांच्या समोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खुप भ्याले.
Luke 2:13 in Marathi 13 मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूता जवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,
Luke 3:21 in Marathi 21 तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहाना व्दारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
Luke 22:43 in Marathi 43 स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला
Luke 22:69 in Marathi 69 पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.
Luke 24:4 in Marathi 4 यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
John 3:3 in Marathi 3 येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
John 3:5 in Marathi 5 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
John 3:13 in Marathi 13 स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.
John 5:19 in Marathi 19 ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून कांहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 5:27 in Marathi 27 आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला.
John 6:26 in Marathi 26 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण त्या भाकरीतून खाल्लेत आणि तृप्त झालात म्हणून माझा शोध करता.
John 6:32 in Marathi 32 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो.
John 6:47 in Marathi 47 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.
John 6:53 in Marathi 53 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही.
John 8:34 in Marathi 34 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.
John 8:51 in Marathi 51 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही होणार नाही.”
John 8:58 in Marathi 58 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”
John 10:1 in Marathi 1 “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यांत दारातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे
John 10:7 in Marathi 7 म्हणून येशू त्यांना पुन्हा ,म्हणाला मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.
John 12:23 in Marathi 23 येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
John 13:16 in Marathi 16 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, दास आपल्या धन्यापेक्षां मोठा नाही; आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा मोठा नाही.
John 13:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
John 13:38 in Marathi 38 येशूने त्याला उत्तर दिले,काय? “तू माझ्यासाठी तू आपला जीव देशील? मी तुला खचीत खचीत सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”
John 14:12 in Marathi 12 “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षां अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
John 16:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
John 16:23 in Marathi 23 आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल.
John 21:18 in Marathi 18 “मी तुला खचीत खचीत सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”
Acts 1:10 in Marathi 10 तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते,तेव्हा पहा ,शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले.
Acts 7:56 in Marathi 56 आणि त्याने म्हटले, पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.
Acts 10:11 in Marathi 11 आणि आपल्यासमोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टान्त त्याला झाला.
2 Thessalonians 1:7 in Marathi 7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देव दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
2 Thessalonians 1:9 in Marathi 9 आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून, आणि त्या दिवशी पवित्र जनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
Hebrews 1:14 in Marathi 14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?
Jude 1:14 in Marathi 14 आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही ह्यांच्याविषयी संदेश देऊन म्हटले आहे की, ‘बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.
Revelation 4:1 in Marathi 1 ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला, “इकडे वर ये, आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो. ”
Revelation 19:11 in Marathi 11 तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला, आणि पाहा, एक पांढरा घोडा, आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव ’विश्वासू आणि खरा’ आहे. तो नीतीने न्याय करतो, आणि युध्द करतो.