John 1:14 in Marathi 14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
Other Translations King James Version (KJV) And the Word was made flesh, and dwelt among us, (and we beheld his glory, the glory as of the only begotten of the Father,) full of grace and truth.
American Standard Version (ASV) And the Word became flesh, and dwelt among us (and we beheld his glory, glory as of the only begotten from the Father), full of grace and truth.
Bible in Basic English (BBE) And so the Word became flesh and took a place among us for a time; and we saw his glory--such glory as is given to an only son by his father--saw it to be true and full of grace.
Darby English Bible (DBY) And the Word became flesh, and dwelt among us (and we have contemplated his glory, a glory as of an only-begotten with a father), full of grace and truth;
World English Bible (WEB) The Word became flesh, and lived among us. We saw his glory, such glory as of the one and only Son of the Father, full of grace and truth.
Young's Literal Translation (YLT) And the Word became flesh, and did tabernacle among us, and we beheld his glory, glory as of an only begotten of a father, full of grace and truth.
Cross Reference Matthew 1:16 in Marathi 16 याकोब योसेफाचा बाप होता . जो मरीयेचा पती होता जीच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला .
Matthew 1:20 in Marathi 20 तो असे विचार करीत असता त्याला स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन दीले, “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस , कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला अाहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
Matthew 17:1 in Marathi 1 मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले.
Luke 1:31 in Marathi 31 पाहा! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नांव तू येशू ठेव.
Luke 2:7 in Marathi 7 तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, आणि तिने त्याला फडक्यामध्ये गुंडाळले व गव्हाणींत ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
Luke 2:11 in Marathi 11 आज तुमच्या साठी दावीदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे ! तो ख्रिस्त प्रभू आहे.
Luke 9:32 in Marathi 32 तेव्हा पेत्र व त्याच्या बरोबर जे होते ते झोंपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज, आणि जे दोन पुरूष त्याच्या जवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले.
John 1:1 in Marathi 1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
John 1:16 in Marathi 16 त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.
John 2:11 in Marathi 11 येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले, आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
John 3:16 in Marathi 16 कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.
John 3:18 in Marathi 18 जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.
John 6:51 in Marathi 51 स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.
John 11:40 in Marathi 40 येशूने तिला म्हटले, “ तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
John 12:40 in Marathi 40 ‘त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये,वळू नये व मी त्यांना बरे करू नये.म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे;
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 14:9 in Marathi 9 येशूने त्याला म्हटले, “ फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हाला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
John 17:22 in Marathi 22 तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे ;
Acts 13:33 in Marathi 33 आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याव्दारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुध्दा वाचतोः‘तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे.’
Romans 1:3 in Marathi 3 ती त्याचा पुत्र येशू आपला प्रभू हयाच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्माला आला.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Romans 9:5 in Marathi 5 पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन.
1 Corinthians 15:47 in Marathi 47 पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला.
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
2 Corinthians 12:9 in Marathi 9 आणि त्याने मला म्हटले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;
Galatians 4:4 in Marathi 4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
Ephesians 3:18 in Marathi 18 “ “यासाठी की,जे पवित्र जन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
Philippians 2:6 in Marathi 6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
Colossians 1:19 in Marathi 19 कारण त्याच्यात सर्व पूर्णता वसावी.
Colossians 2:3 in Marathi 3 त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे निधी लपलेले आहेत.
Colossians 2:9 in Marathi 9 कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते.
1 Timothy 1:14 in Marathi 14 परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
Hebrews 1:5 in Marathi 5 त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.” देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “मी त्याचा पिता होईन ? व तो माझा पुत्र होईल ?
Hebrews 2:11 in Marathi 11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही.
Hebrews 2:14 in Marathi 14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला,येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
Hebrews 5:5 in Marathi 5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने प्रमुख याजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”
Hebrews 10:5 in Marathi 5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
1 Peter 2:4 in Marathi 4 मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता,
2 Peter 1:16 in Marathi 16 कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे एेश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो.
1 John 1:1 in Marathi 1 जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे,त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
1 John 4:2 in Marathi 2 अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा; “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे.
1 John 4:9 in Marathi 9 देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे.
1 John 4:14 in Marathi 14 ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे.
2 John 1:7 in Marathi 7 कारण फसवणूक करणारी,म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत.फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.
Revelation 21:3 in Marathi 3 आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, ‘पाहा'! देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील. ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.