Hebrews 12:23 in Marathi 23 आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत , आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश, व तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात.
Other Translations King James Version (KJV) To the general assembly and church of the firstborn, which are written in heaven, and to God the Judge of all, and to the spirits of just men made perfect,
American Standard Version (ASV) to the general assembly and church of the firstborn who are enrolled in heaven, and to God the Judge of all, and to the spirits of just men made perfect,
Bible in Basic English (BBE) To the great meeting and church of the first of those who are named in heaven, and to God the judge of all, and to the spirits of good men made complete,
Darby English Bible (DBY) the universal gathering; and to [the] assembly of the firstborn [who are] registered in heaven; and to God, judge of all; and to [the] spirits of just [men] made perfect;
World English Bible (WEB) to the general assembly and assembly of the firstborn who are enrolled in heaven, to God the Judge of all, to the spirits of just men made perfect,
Young's Literal Translation (YLT) to the company and assembly of the first-born in heaven enrolled, and to God the judge of all, and to spirits of righteous men made perfect,
Cross Reference Matthew 25:31 in Marathi 31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.
Luke 10:20 in Marathi 20 तथापि तुम्हाला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
John 5:27 in Marathi 27 आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला.
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
1 Corinthians 13:12 in Marathi 12 आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन,
1 Corinthians 15:49 in Marathi 49 आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू.
1 Corinthians 15:54 in Marathi 54 हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मर्त्य आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा “विजयात मरण गिळले गेले आहे.”
2 Corinthians 5:8 in Marathi 8 आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.
Ephesians 1:22 in Marathi 22 “देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवले, आणि त्याला सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले,
Ephesians 5:24 in Marathi 24 ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
Philippians 1:21 in Marathi 21 कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.
Philippians 3:12 in Marathi 12 मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यांत घेतले ते मी आपल्या ताब्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे.
Philippians 4:3 in Marathi 3 आणि हे माझ्या खर्या सोबत्या, पण मी तुलाहि विनवितो की, तू ह्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.
Colossians 1:12 in Marathi 12 आणि प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हाला पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
2 Thessalonians 1:5 in Marathi 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
1 Timothy 3:5 in Marathi 5 जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?
Hebrews 6:10 in Marathi 10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
Hebrews 9:27 in Marathi 27 ज्याअर्थी लोकांना एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले अाहे,
Hebrews 11:4 in Marathi 4 विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान होता अशी त्याने साक्ष मिळवली. कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली. आणि त्याद्वारे तो मेला आहे तरी बोलतो.
Hebrews 11:40 in Marathi 40 कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.
James 1:18 in Marathi 18 आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
1 Peter 2:23 in Marathi 23 त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण जो नीतीने न्याय करतो त्याच्यावर त्याने स्वतःस सोपवले.
Revelation 7:14 in Marathi 14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.
Revelation 14:4 in Marathi 4 स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुध्द आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकर्याला प्रथम फळ असे आहेत.
Revelation 20:15 in Marathi 15 आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.