Hebrews 12:2 in Marathi 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
Other Translations King James Version (KJV) Looking unto Jesus the author and finisher of our faith; who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is set down at the right hand of the throne of God.
American Standard Version (ASV) looking unto Jesus the author and perfecter of `our' faith, who for the joy that was set before him endured the cross, despising shame, and hath sat down at the right hand of the throne of God.
Bible in Basic English (BBE) Having our eyes fixed on Jesus, the guide and end of our faith, who went through the pains of the cross, not caring for the shame, because of the joy which was before him, and who has now taken his place at the right hand of God's seat of power.
Darby English Bible (DBY) looking stedfastly on Jesus the leader and completer of faith: who, in view of the joy lying before him, endured [the] cross, having despised [the] shame, and is set down at the right hand of the throne of God.
World English Bible (WEB) looking to Jesus, the author and perfecter of faith, who for the joy that was set before him endured the cross, despising shame, and has sat down at the right hand of the throne of God.
Young's Literal Translation (YLT) looking to the author and perfecter of faith -- Jesus, who, over-against the joy set before him -- did endure a cross, shame having despised, on the right hand also of the throne of God did sit down;
Cross Reference Matthew 16:21 in Marathi 21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरुशलेमेला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.
Matthew 20:18 in Marathi 18 “पाहा, आपण यरुशलेमेकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरतील.
Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
Matthew 26:67 in Marathi 67 तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.
Matthew 27:27 in Marathi 27 नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले.आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली.
Mark 9:12 in Marathi 12 तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्व काही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
Mark 9:24 in Marathi 24 तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.”
Mark 14:36 in Marathi 36 तो म्हणाला, “अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.”
Luke 17:5 in Marathi 5 मग शिष्य प्रभू येशूला म्हणाले, 'आमचा विश्वास वाढव'.
Luke 23:11 in Marathi 11 हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्याला पिलाताकडे परत पाठवले.
Luke 23:35 in Marathi 35 लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!
Luke 24:26 in Marathi 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?
John 1:29 in Marathi 29 दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येतांना पाहून योहन म्हणाला, “हा, पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
John 6:40 in Marathi 40 माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”
John 8:56 in Marathi 56 माझा दिवस बघायला तुमचा पिता अब्राहाम उल्हासीत झाला; तो त्याने पाहीला व त्याला हर्ष झाला.”
John 12:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मेला तर तो पुष्कळ पीक देतो.
John 12:27 in Marathi 27 “आता माझा जीव अस्वस्थ होत आहे, आणि मी काय बोलू?हे बापा, तू ह्या घटकेपासून माझे रक्षण कर.पण मी ह्या कारणासाठीच या घटकेत आलो आहे.
John 12:32 in Marathi 32 आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
John 13:3 in Marathi 3 येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते, आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
John 13:31 in Marathi 31 तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे, आणि त्याच्या ठायी देवाचे गौरव झाले आहे;
John 17:1 in Marathi 1 ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “ हे बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर .
Acts 2:25 in Marathi 25 दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो; 'मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे;
Acts 2:36 in Marathi 36 म्हणून इस्त्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
Acts 5:31 in Marathi 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
Acts 5:41 in Marathi 41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;
1 Corinthians 1:7 in Marathi 7 म्हणून तुम्हांत कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता.
Ephesians 2:16 in Marathi 16 त्याने वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात त्या दोघांचा देवाबरोबर समेट करावा.
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
Philippians 1:6 in Marathi 6 आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा भरवसा आहे.
Philippians 2:8 in Marathi 8 आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले, आणि त्याने मरण,आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले;येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
Philippians 3:20 in Marathi 20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहात आहो.
2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
Hebrews 1:13 in Marathi 13 तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, “तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”
Hebrews 2:7 in Marathi 7 थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले तू त्याला गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 7:19 in Marathi 19 कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हाला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
Hebrews 8:1 in Marathi 1 आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे कीः असा मुख्य याजक आम्हाला लाभलेला आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो,
Hebrews 9:28 in Marathi 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याच्या तारणाची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
Hebrews 10:5 in Marathi 5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
Hebrews 10:14 in Marathi 14 कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले.
Hebrews 10:33 in Marathi 33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.
Hebrews 11:36 in Marathi 36 आणखी दुसर्यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला.
Hebrews 12:3 in Marathi 3 तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.
Hebrews 13:13 in Marathi 13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
1 Peter 1:11 in Marathi 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.
1 Peter 2:23 in Marathi 23 त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण जो नीतीने न्याय करतो त्याच्यावर त्याने स्वतःस सोपवले.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 Peter 3:22 in Marathi 22 तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे; आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
1 Peter 4:14 in Marathi 14 ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहा .कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहीला आहे.
1 John 1:1 in Marathi 1 जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे,त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
Jude 1:21 in Marathi 21 तुम्ही अनंतकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.
Revelation 1:8 in Marathi 8 प्रभू देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे. ”
Revelation 1:11 in Marathi 11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही, आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया ह्या सात मंडळ्यांना पाठव. ”
Revelation 1:17 in Marathi 17 मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या सारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला,
Revelation 2:8 in Marathi 8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो